#SameerWankhede : कोऱ्या कागदांवरील सह्यांचा पॅटर्न जुनाच? आणखी एका पंचाचा गौप्यस्फोट
NCB चे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांनी आर्यन खानच्या (Aryan Khan)अटक प्रकरणात खंडणी वसुल करण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप या प्रकरणातील पंच प्रभाकर साईल (Prabhakar sail)यांनी केला आहे. यामुळे खळबळ उडालेली आहे. तसेच NCBच्या कारभारावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यातच आता समीर वानखेडे यांच्यावर आणखी एका पंचाने गंभीर आरोप केल्याने समीर वानखेडे यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
आर्यन खान ड्रग प्रकरणानंतर अनेक पैलू समोर येऊ लागलेत. NCB च्या याधीच्या नवी मुंबईतील एका कारवाईत पंच राहिलेल्या शेखर कांबळे (Shekhar) यांनी देखील मोठा गौप्यस्फोट केला आहे. शेखर कांबळे यांनी कोपरखैरणे पोलीस ठाण्यात तक्रार देखील दाखल केलीय. आपल्या जीवाला धोका असल्याची तक्रार त्यांनी दाखल केली. खारघर येथे नायजेरियन नागरिकावर NCBने केलेल्या कारवाईत ड्रग्ज सापडले नव्हते तरी त्याच्याकडे ड्रग्ज सापडले असल्याचे दाखवण्यात आल्याचा आरोप कांबळे यांनी केला आहे. तसेच समीर वानखेडे यांनी या कारवाई दरम्यान ८ ते १० को-या कागदांवर आपल्या सह्या घेतल्याचा आरोप शेखर कांबळे यांनी केला आहे. तसेच NCB कार्यालयातील अधिकारी अनिल माने यांनी आपल्याला वॉट्सअप कॉल करुन कार्यालयात बोलवले होते, त्यामुळे आपण घाबरलो असल्याने कोपरखैरणे पोलीस ठाण्यात तक्रार केली असल्याचा खुलासा शेखर कांबळे यांनी केला आहे.
नवी मुंबईत एका नायजेरियन नागरिकावर ड्रग्ज विक्रीच्या संशयातून NCBने कारवाई केली होती. पण त्याच्याकडे काहीही सापडले नव्हते. त्यानंतर वानखेडे यांनी आपल्याला NCB कार्यालयात बोलावून कोऱ्या कागदांवर सही करण्यास सांगितले होते. पण नवाब मलिक यांनी नुकतेच एका NCB अधिकाऱ्याचे पत्र जाहीर केले, त्यामध्ये आपण पंच असलेल्या प्रकरणाचा उल्लेख आहे, आणि त्यात त्या नायजेरियन नागरिकाकडे ड्रग्ज सापडल्याचे सांगण्यात आल्याचे समजताच, आपण याप्रकरणी बोलले पाहिजे असे शेखर कांबळे यांनी सांगितले आहे. तसेत आपण कोर्टातही याबाबत माहिती देण्यास तयार असल्याचे शेखर कांबळे यांनी म्हटले आहे.