उल्हासनगरात बॉम्ब ठेवल्याचा पोलीस आयुक्तांना निनावी ई-मेल; तीन तास कसून तपास
उल्हासनगर कॅम्प 2 मधील गोल मैदानात बॉम्ब ठेवल्याचा निनावी ई-मेल उल्हासनगर पोलीस उपायुक्त कार्यालयाला प्राप्त झाला , त्यानंतर तात्काळ उल्हासनगर पोलिसांनी उल्हासनगर भागात जाऊन तब्बल 3 तास तपासणी केली.;
उल्हासनगर : उल्हासनगर कॅम्प 2 मधील गोल मैदानात बॉम्ब ठेवल्याचा निनावी ई-मेल उल्हासनगर पोलीस उपायुक्त कार्यालयाला प्राप्त झाला , त्यानंतर तात्काळ उल्हासनगर पोलिसांनी उल्हासनगरच्या मध्य भागात व गर्दीचे ठिकाण असलेल्या गोल मैदानाचा ताबा घेतला अप्पर पोलीस आयुक्त कार्यालयातील बॉम्बशोधक पथकाने शोध मोहीम सुरू केली, हे शोध पथक सायंकाळी सात वाजता कामाला लागले संपूर्ण रात्री मैदानाची पाहणी केल्यानंतर पथक रवाना झाले. या सर्च ऑपरेशन दरम्यान घटनास्थळी पोलिस आयुक्त राठोड ,वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कदम, पोलीस उपनिरीक्षक आणि जवळपास पन्नास पोलीस या शोधकार्यात सहभागी झाले होते. सध्या हा ई-मेल खोटा असल्याचा समोर आले असून तरीही पोलीस मोठ्या प्रमाणात उल्हासनगर परिसरामध्ये बंदोबस्त तैनात झाले आहे.