अण्णाभाऊ साठे यांच्या तैलचित्राचे १४ सप्टेंबर ला मॉस्कोत अनावरण!

स्वातंत्र्याच्या आकांक्षेने झपाटलेल्या आणि अन्याय व पराधीनतेविरूध्द संघर्ष सिद्ध झालेल्या जागतिक समुदायाची स्पंदने टिपणाऱ्या व त्यातून 'लेनिनग्राडचा पोवाडा' या सारखी प्रतिभासंपन्न काव्य निर्मिती करणाऱ्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या तैलचित्राचे येत्या १४ सप्टेंबर ला मॉस्कोतील भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेच्या सांस्कृतिक केंद्रात समारंभपूर्वक अनावरण होणार आहे.

Update: 2022-09-06 13:09 GMT

स्वातंत्र्याच्या आकांक्षेने झपाटलेल्या आणि अन्याय व पराधीनतेविरूध्द संघर्ष सिद्ध झालेल्या जागतिक समुदायाची स्पंदने टिपणाऱ्या व त्यातून 'लेनिनग्राडचा पोवाडा' या सारखी प्रतिभासंपन्न काव्य निर्मिती करणाऱ्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या तैलचित्राचे येत्या १४ सप्टेंबर ला मॉस्कोतील भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेच्या सांस्कृतिक केंद्रात समारंभपूर्वक अनावरण होणार आहे.

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय राज्यमंत्री नारायण स्वामी यांच्या उपस्थितीत होणाच्या या सोहोळ्याच्या अध्यक्षस्थानी भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे अध्यक्ष डॉ. विनय सहस्रबुध्दे हे असणार आहेत. आज मुंबईत एका पत्रकार परिषदेत डॉ. सहस्रबुध्दे व हे तैलचित्र उपलब्ध करून देणाऱ्या मिलेनियम चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज के सुनिल बारे यांनी ही माहिती दिली.

अण्णा भाऊंनी आपलं काही लिखाण रशियाबद्दल केलेले आहे, त्यामध्येसुद्धा स्टालिनग्राडचा पोवाडा, माझा रशियाचा प्रवास आणि अण्णा भाऊंच्या रशियन भाषेत भाषांतरित झालेल्या अनेक कथा आणि कादंबऱ्या यांचा समावेश आहे. यामुळे अण्णा भाऊ रशियामध्येसुद्धा प्रसिद्ध झाले होते. 'रुडमिनो मागरिटा फॉरेन लँग्वेज स्टडी 'येथे मुंबई विद्यापीठाच्या माध्यमातून साहित्यरत्र अण्णा भाऊ साठे यांचा पुतळा बसवण्यात आला आहे. एक अर्थाने आंतरराष्ट्रीय पातळीवरील कायमस्वरूपी असे स्मारक तेथे उभे राहिले आहे. या पुतळ्याचे अनावरणही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे.

अण्णा भाऊंच्या लेखणीने भाषेच्या आणि देशाच्या सीमासुद्धा ओलांडलेल्या आहेत. युद्धांच्या इतिहासातील सर्वात मोठे युद्ध आपण ज्याला स्टालिनग्राडचा लढा म्हणतो, ही दुसऱ्या महायुद्धातील सर्वात मोठी लढाई होती. आपण तिला युद्धाचा 'टर्निंग पॉईंट 'म्हणू शकतो, अशी

ती लढाई होती. याच घटनेवर आधारित स्टालिनग्राडचा पोवाडा नावाचे एक दीर्घ काव्य साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांनी रचलेले आहे. या युद्धाला त्यांनी मानवतेच्या मुक्तीचे युद्ध असे नाव दिले आहे. रशिया या राष्ट्राच्या अस्तित्वाच्या लढ्यावर लिहिलेले, त्यातील सर्वसामान्य लोकांचा सहभाग, स्त्रियांचा सहभाग यावर त्यांनी आपल्या लेखणीतून प्रकाश टाकला आहे. त्यामुळेच अण्णा भाऊंची रशियातील लोकप्रियता वाढली होती.

या निमित्ताने शेकडो अण्णाभाऊ साठे प्रेमींच्या उपस्थितीतीत जे अन्य अनेक कार्यक्रम मॉस्कोत १४ व १५ सप्टेंबरला होऊ घातले आहेत त्यातीलच एक महत्वाचा कार्यक्रम म्हणजे भारत-रशिया राजनैतिक संबंध स्थापनेच्या ७५ व्या वर्षाला अनुसरून या विषयावर योजण्यात आलेली आंतरराष्ट्रीय परिषद !' रुडमिनो मागरिटा फॉरन लैंग्वेज लायब्ररी 'मॉस्को येथे ही परिषद घेण्यात येणार आहे व त्यामध्ये मॉस्को स्टेट युनिव्हर्सिटी मॉस्को, 'इन्स्टिट्यूट ऑफ ओरिएंटल स्टडीज', 'रशियन अॅकॅडमी ऑफ सायन्सेस 'मॉस्को, 'स्टेट युनिव्हर्सिटी, सेंट पिटर्सबर्ग 'आणि 'रुडमिनो मार्गारिटा फरिन लैंग्वेज लायब्ररी यांचा समावेश आहे. भारतातून भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेबरोबरच मुंबई विद्यापीठाने या आयोजनात महत्वाची भूमिका बजावली आहे. विद्यापीठातील सेंटर फॉर युरेशियन स्टडिज'चे संचालक डॉ. संजय देशपांडे, तसेच लोकशाहीर अण्णा भाऊ साठे अध्यासनाचे संचालक डॉ. बळीराम गायकवाड यांचा यांत विशेष पुढाकार आहे. या सर्व कार्यक्रमांना डॉ. रवींद्र कुलकर्णी, प्र. कुलगुरु आणि डॉ. सुहास पेडणेकर, कुलगुरू, मुंबई विद्यापीठ यांचे मार्गदर्शन आणि सहकार्य आहे..

या शिवाय या निमित्ताने ५० वर्षांपूर्वी रशियन भाषेत भाषांतरित, प्रकाशित झालेल्या अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यकृतींचे मॉस्को स्टेट युनिव्हर्सिटी च्या माध्यमातून पुनर्प्रकाशनही करण्यात येत आहे. यामध्ये 'चित्रा', 'फकिरा 'अशा कादंबऱ्या आणि 'सुलतान'सारख्या कथांचाही समावेश आहे.

Tags:    

Similar News