अण्णाभाऊसाठे यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने फकिराचे स्मारक उभारण्यासाठी एक सामाजिक चळवळ उभी राहिली आहे. फकिरा हा कांदबरीचा नायक म्हणूनच पाहिला जातो. परंतु तो इतिहासातील बंडखोर नायक आहे. तरीही त्याची ऐतिहासिक मांडणी करण्याचा अद्यापतः फारसा प्रयत्न झालेला नाही. सामाजिक परिवर्तनचळवळीच्या आणि इतिहासाच्या अंगाने फकिराचा शोध घेण्याचा प्रयत्न प्रा. सचिन गरुड यांच्या विचारप्रवर्तक विश्लेषणातून...