सचिन वाझे प्रकरणी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह वरीष्ठ अधिकाऱ्यांना अभय

सचिन वाझे प्रकरणानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत काय झाले.

Update: 2021-03-15 14:04 GMT

मुकेश अंबानी यांच्या घराजवळ सापडलेल्या स्फोटक प्रकरणी पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना अटक करण्यात आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसची महत्त्वाची बैठक सोमवारी पार पडली. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार स्वत: उपस्थित होते. सचिन वाझे प्रकरण गृहखात्याने ज्या पद्धतीने हाताळले ते पाहता गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर पवार नाराज असल्याची चर्चा होती. पण गृहमंत्री अनिल देशमुख हे गृहमंत्रीपदी कायम राहणार आहेत कुणी अफवा उठवू नये असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

या प्रकरणाचा तपास सुरू आहे, त्यामुळे यावर सरकारतर्फे कुणीही काहीही बोलणार नाही, पण तपासात जे कुणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले. मुंबईचे पोलीस आयुक्त परबवीर सिंग यांच्यावर कारवाई होईल का या प्रश्नावर जयंत पाटील यांनी चौकशीमध्ये जे समोर येईल त्यानंतर कुणावर कारवाई करायचे ते ठरवले जाईल असे सांगितले. या प्रकरणात सत्तेत एकत्र असलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेत कोणतेही मतभेद नाहीत असाही दावा जयंत पाटील यांनी केला आहे.

Tags:    

Similar News