'...तर कोरोनाची संभाव्य तिसरी लाट रोख्यण्यासाठी लॉकडाऊन लावण्यात येऊ शकते' -भारती पवार
कोरोना रुग्ण संख्या वाढतच राहिली तर पुढील काळात लॉकडाऊनचा निर्णय घेतला जाऊ शकतो असा इशारा केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी दिला.;
उस्मानाबाद // राज्यात पुन्हा एकदा कोरोना संख्येत वाढ होत असल्याने आरोग्य यंत्रणेच्या चिंतेत भर पडली आहे. तसेच कोरोनाचा नवा व्हेरिएंट असलेल्या ओमायक्रॉनने देखील राज्यात शिरकाव केला आहे. रुग्ण संख्या वाढतच राहिली तर पुढील काळात लॉकडाऊनचा निर्णय घेतला जाऊ शकतो असा इशारा केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी दिला. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार तुळजापुरात प्रसारमाध्यमांशी संवाद बोलत होत्या
केंद्रीय मंत्री भारती पवार म्हणाले की, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यास परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते. रुग्णसंख्या अशीच वाढल्यास कोरोनाची संभाव्य तिसरी लाट रोख्यण्यासाठी लॉकडाऊन लावण्यात येऊ शकते. तसेच जर एखाद्या मंदिर परिसरात मोठ्या संख्येने कोरोनाबाधित आढळून येत असतीलत, तर ते मंदिर चालू ठेवायचे की बंद याचा निर्णय मंदिर प्रशासन घेऊ शकते असे देखील त्यांनी यावेळी म्हटले आहे.