'बाबा!! इतिहास बनाती इस रफ्तार में आप हो...' , पंकजा मुंडे यांचं भावनिक ट्वीट

अहमदनगर ते आष्टी या 60 किलोमीटर अंतराचा रेल्वे प्रकल्प पूर्ण झाला असून बुधवारी सकाळी नगरहून सोलापूरवाडी व तेथून आष्टीपर्यंत रेल्वे धावली आहे. पटरीवरून रेल्वे धावल्याचे पाहून जिल्हावासियांना स्वप्न पूर्ण होत असल्याचा आनंद होत होता. दरम्यान भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी या रेल्वेचा फोटो शेअर करत गोपीनाथ मुंडेंच्या आठवणी जागवल्यात;

Update: 2021-12-30 01:50 GMT

बीड// अहमदनगर ते आष्टी या 60 किलोमीटर अंतराचा रेल्वे प्रकल्प पूर्ण झाला असून बुधवारी सकाळी नगरहून सोलापूरवाडी व तेथून आष्टीपर्यंत रेल्वे धावली आहे. पटरीवरून रेल्वे धावल्याचे पाहून जिल्हावासियांना स्वप्न पूर्ण होत असल्याचा आनंद होत होता. दरम्यान भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी या रेल्वेचा फोटो शेअर करत गोपीनाथ मुंडेंच्या आठवणी जागवल्यात

बाबा!! इतिहास बनाती इस रफ्तार में आप हो, हमारे हर आगाज में आप हो, जो देखो बीड वासियों की आंखो में आज, सच कहती हूं खुशी से नम हर आंखो के अंदाज में आप हो..प्रसंग जो भी हो हर नारे की आवाज में आप हो !!

असे पंकजा यांनी ट्विटरवरुन म्हटलंय. सोबतच त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचेही आभार मानलेत, पंकजा यांनी आपल्या ट्विटमध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभारही मानले. त्यानंतर, देवेंद्र फडणवीस यांनीही पंकजा मुंडेंचे ट्विट रिट्विट करत मुंडे भगिनींचे कौतुक केले. आमचे नेते गोपीनाथ मुंडे यांचे स्वप्न पूर्ण होत आहे ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट असल्याचं फडणवीस म्हणालेत.

अहमदनगर-बीड-परळी हा प्रकल्प तीन हजार कोटींच्या पुढील असून नगर ते आष्टी साठ किलोमीटरची पटरी रेल्वे धावण्यासाठी सज्ज झाली असताना मागील महिन्यात धावणारी रेल्वे तांत्रिक अडचणीमुळे धावली नव्हती. पण, बुधवारी बीड जिल्हावासियांचे गेल्या अनेक वर्षापासूनचे रेल्वेचे स्वप्न पूर्ण झाले आहे.

Tags:    

Similar News