लाचखोर अधिकारी पकडून देण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून करण्यात आले आवाहन
बीड जिल्ह्यात गेले काही दिवसापासून गले लठ्ठ पगार असलेले अधिकारी देखील लाच घेत असल्याचे निष्पन्न झाले आहे. दिवसेंदिवस लाचखोर अधिकारी एसीबीच्या जाळ्यात अडकले जात आहेत. हे सांगत असतानाच बीड मधील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी शंकर शिंदे यांनी सामान्य जनतेला लाचखोर अधिकारी कोणतीही भीती न बाळगता पकडून देण्यासाठी योग्य आवाहन केले आहे.