बीड : बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर मागील चार दिवसांपासून उपोषणास बसलेल्या महिलेने आज सकाळी थेट झाडावर चढून आंदोलन केल्यानं प्रशासनाची एकच तारांबळ उडाली आहे. पतीच्या आत्महत्येस जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल होऊन देखील कोणतीही कारवाई होत नसल्याने, तारामती साळुंके यांनी
जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर 2 ऑक्टोबरपासून उपोषण सुरू केलं होतं. मात्र या उपोषणाची दखल प्रशासन घेत नसल्यानं त्यांनी आज सकाळी झाडावर चढून आपल्या मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. दरम्यान तारामती साळुंके या थेट झाडावर लढल्याने प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली. प्रशासनाच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर सदरील महिलेस विनवण्याकरून खाली उतरवण्यास पोलिसांना यश आलं आहे. दरम्यान आता तरी प्रशासन या महिलेच्या प्रश्नांची दखल घेणार का? हा प्रश्न आहे.