भारतीय जनता पक्षाचे अमरावतीचे आमदार प्रवीण पोटे यांनी एक कौतुकास्पद संकल्प केला. त्यांच्या संकल्पाची कॉलेजच्या तब्बल दहा हजार विद्यार्थी आणि पालकांनी शपथ घेतली. नेमका त्यांनी कोणता संकल्प केला आहे वाचा विशेष बातमी...
भारतीय जनता पक्षाचे अमरावतीचे आमदार प्रवीण पोटे यांनी 'अंत्योदय' मोहिमेअंतर्गत एक संकल्प हाती घेतला आहे. यापुढे अमरावतीत कोणीही उपाशी राहणार नसल्याचा मनोदय पोटे यांनी व्यक्त केला आहे. अमरावतीत सर्वांना वेळेवर अन्न मिळावे आणि त्यासाठी आपल्या प्रत्येकाचे योगदान राहावे यासाठी अमरावती शहरात अनेक ठिकाणी 'अंत्योदय' लिहलेले काचेचे बॉक्स लावण्यात आलेले आहे आणि त्यात विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या गटाने चहाच्या टपरीवर, नास्ताच्या गाड्यावर, जेवणाच्या हॉटेलमध्ये जास्त पैसे मोजावेत आणि त्या पैशातून गरजूंनी पैसे न देता खाण्यापिण्याचे पदार्थ घ्यावेत.
अमरावतीतील अज्ञात, गरीब, गरजू लोकांना स्वतःची ओळख न देता आणि कोणाचा चेहरा 'नकळता' मदत करणे ही प्रत्येक अमरावती नागरिकांची परंपरा झाली पाहीजे आणि हाच पॅटर्न संपूर्ण देशात राबविला गेला पाहिजे, असं मत आमदार प्रवीण पोटे यांनी व्यक्त केले.