अमरावती :अमरावती महानगरपालिकेच्या कंत्राटी सफाई कामगारांचा सोमवार पासून बेमुदत संप सुरु आहे,त्यामुळे शहरातील रस्त्याच्या मुख्य कडेला असलेल्या कचरा कंटेनरमध्ये मोठ्या प्रमाणात कचरा गोळा झाल्याने कंटेनर तसेच आजूबाजूला कचऱ्याचे ढिगारे पडल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे सर्वत्र दुर्गंधी आणि घाणीचे साम्राज्य पसरले असून त्यामुळे शहरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे,स्वच्छता कामगारांना वेळेत वेतन मिळत नाही,मागच्या काळात कमी वेतन देणे सुरू आहे. तसेच आरोग्याच्या दृष्टीने कोणते प्रकारचे सुरक्षा कीट नाही तर कंपनीत पिळवणूक करत असल्याचा आरोप या कर्मचाऱ्यांनी केला आहे. त्यामुळे या बेमुदत संपाचा परिणाम शहरातील स्वच्छतेवर झाला आहे, कामगारांनी जय संविधान संघटनेचे अध्यक्ष अलीम पटेल यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन सुरू केले असून मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत शहरातील कचरा उचलण्याचे काम उचलणार नसल्याचे सफाई कामगारांनी सांगितले.
पूजा कंट्रक्शन कंपनी कडून सफाई कामगारांची मोठ्या प्रमाणात आर्थिक शोषण सुरू असल्याचा आरोप कामगारांनी केला आहे त्यामुळे ते संपावर गेले आहे.