"कुछ दिन तो बिताओ गुजरात में,व्हिडीओ बघून महाराष्ट्रातील अंधभक्त विचलित"
"गुजरातमधे भाजपच्या कार्यकर्त्यांनीच भाजपचे कार्यालय फोडले";
मुंबई : देशात कोरोनाचा आकडेवारी वाढत असताना, नीट सुविधा मिळत नाही. त्यामुळे लोकांमध्ये संताप पाहायला मिळत आहे.असाच एक व्हिडिओ ट्विटर पोस्ट करत राष्ट्रवादीचे नेते व आमदार अमोल मिटकरी यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
मिटकरी यांनी ट्विटर एक व्हिडिओ पोस्ट केला असून, ज्यात काही लोकं एका कार्यालयातील टेबल, खर्च्याची नासधूस करत आहे. तसेच व्हिडीओ सोबत दावा करण्यात आला आहे की,"गुजरातमधे भाजपच्या कार्यकर्त्यांनीच भाजपचे कार्यालय फोडले. लोकांना नीट सुविधा मिळत नाहीत म्हणून खवळलेल्या कार्यकर्त्यांनी ऑफीस फोडून टाकले. हा व्हिडिओ बघून महाराष्ट्रातील अंधभक्त विचलित झाले आहेत."