"अरे टिल्ल्या तुझ्यात हिंमत असेल तर.... राज्याभिषेक सोहळ्यावरुन खडाजंगी
राज्य सरकारकडून २ जूनला रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा करण्यात आला. या सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार, खासदार उदयनराजे भोसले आणि अन्य आमदार उपस्थित होते. परंतु या कार्यक्रमात विरोधकांना डावलल्याने नाराजीचा सुर दिसून आला. अनेकांनी शिंदे-फडवीस सरकारवर टिकाही केली आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी आणि भाजपा आमदार नितेश राणे यांच्यात खडाजंगी झाली आहे.
अमोल मिटकरींनी सरकारवर ट्वीट करत टीका केली आहे. “छत्रपती शिवाजी महाराजांचा तिथीनुसार राज्याभिषेक सोहळा सनातन धर्म प्रचारासाठी होता का? असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. छत्रपती शिवरायांनी निर्माण केलेलं राज्य हे सनातनी नव्हतं. ते रयतेच स्वराज्य होतं. तुम्ही परत परत चुक करताय. तुमचा टकमकी वरून लवकरच जनता कडेलोट करेल,” अशी खरमरीत टीका मिटकरी केली आहे.
“ज्या सनातनी प्रवृत्तीने शिवरायांचा राज्याभिषेक नाकारला, त्यांनाच डोक्यावर घेऊन मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी सत्तेचा गैरवापर करत तिथीनुसार हा कार्यक्रम राबवला. महाराष्ट्रातील शिवप्रेमी याचं चोख उत्तर देईल. तुम्ही रायगडाच्या पवित्र भूमीत सनातनी सत्तेचा उन्माद केलाय,” असा आरोपही मिटकरींनी केला होता.
ज्या सनातनी प्रवृत्तीने शिवरायांचा राज्याभिषेक नाकारला त्यानाच डोक्यावर घेऊन मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी सत्तेचा गैरवापर करुन तिथीनुसार हा कार्यक्रम राबवलाय. महाराष्ट्रातील शिवप्रेमी जनता याचं चोख उत्तर देईल. तुम्ही रायगडाच्या पवित्र भुमित सनातनी सत्तेचा उन्माद केलाय.
— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) June 2, 2023
यावरून भाजपा आमदार नितेश राणे यांनी अमोल मिटकरींना आव्हान दिलं. “अमोल मिटकरी हे फार लहान आहेत. कारण, ते चेकशिवाय बोलत नाहीत. मला याचा अनुभव आहे. अमोल मिटकरी यांच्यात हिंमत असेल, तर उद्धव ठाकरेंना जाऊन सांगाव की, एकच शिवजयंती साजरी करावी.” असा टोलाही नितेश राणेंनी लगावला आहे. याला आता अमोल मिटकरींनी अप्रत्यक्षपणे नितेश राणेंवर घणाघात केला आहे.
अमोल मिटकरी यांनी पलटवार करत म्हणाले की, “अरे टिल्ल्या तुझ्यात हिंमत असेल, तर सनातन्यांनी शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला का विरोध केला? शिवाजी महाराजांना धर्म शुद्धीचा अधिकार नाही असे सनातन्यांनी का म्हटले? व गागाभट्टाला काशीवरून का बोलावले? या प्रश्नाचे उत्तर तेवढे दे माझाही बाउन्स न होणारा चेक तुला देतो,” असं आव्हान मिटकरींनी दिलं आहे.
अरे टिल्ल्या तुझ्यात हिम्मत असेल तर सनातन्यांनी शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला का विरोध केला? शिवाजी महाराजांना धर्म शुद्धीचा अधिकार नाही असे सनातन्यांनी का म्हटले? व गागाभट्टाला काशीवरून का बोलावले? या प्रश्नाचे उत्तर तेवढे दे माझाही बाउन्स न होणारा चेक तुला देतो. pic.twitter.com/YPtDXjHeTN
— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) June 2, 2023