नरेंद्र मोदी यांच्या मतदार संघात लॉकडाऊन लावण्याचे अलाहाबाद न्यायालयाचे आदेश
देशात मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. उत्तर प्रदेशमधील वाराणसी, कानपुर नगर, प्रयागराज, लखनऊ आणि गोरखपुर या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढले आहेत. ही रुग्ण वाढ थांबवण्यासाठी आता न्यायालयानेच लॉकडाऊन लावण्याचे आदेश योगी सरकारला दिले आहेत.
विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी मतदार संघात परिस्थिती हाताबाहेर गेली असल्याने न्यायालयाने हस्तक्षेप करत सरकारला लॉकडाऊन लावण्याचे आदेश दिले आहेत.
उत्तर प्रदेशमधील वाराणसी, कानपुर नगर, प्रयागराज, लखनऊ आणि गोरखपुर या जिल्ह्यात न्यायालयाने आता 26 एप्रिल पर्यंत लॉकडाऊन लावण्याचे आदेश दिले आहेत.