अंबादास दानवे यांचं निलंबन, शिविगाळ प्रकरणं भोवलं...

चंद्रकांत पाटलांचा प्रस्ताव,दानवेंच निलंबन, विरोधी पक्षाची घोषणाबाजी न सभात्याग....;

Update: 2024-07-02 10:05 GMT

मुंबई (विधान परिषद) - विधान परिषदेमध्ये शिविगाळ प्रकरणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचं निलंबन करावं या साठी सत्ताधारी पक्ष आज सकाळ पासून आक्रमक होता. दानवे यांचं निलंबन झाल्या शिवाय सभागृहाचं कमकाज चालून देणार नाही. असा पवित्रा सत्ताधारी आमदारांनी घेतला होता. या संदर्भात सकाळ पासून विधान परिषदेत गोंधळ चालू आसल्याने तीन वेळा सभागृह एक-एक तासांसाठी तहकूब करण्यात आले होते.

या नंतर दुपारच्या सत्रात संसदीयकार्य मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधान परिषद सभागृहात विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या निलंबनाचा प्रस्ताव ठेवला. हा प्रस्ताव ठेवल्यावर प्रस्तावावर आवाजी मतदान घेत सभापती विधान परिषद निलम गोऱ्हे यांनी निलंबनाचा प्रस्ताव संम्मत केला. सभागृहामध्ये असंसदीय भाषेचा वापर केला गेला. विरोधी पक्ष नेते हे संसदीय पद असताना देखील अंबादास दानवे यांच्याकडून सत्ताधारी पक्षाचे आमदार प्रसाद लाड यांना शिविगाळ केली. हे संसदीय कामकाजाला धरून नाही. या प्रकरणी कारवाई म्हणून पाच दिवसाचं निलंबन विरोधी पक्ष नेत्यांचं करण्यात यावं. असा प्रस्ताव मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कडून ठेवण्यात आला होता.

शिविगाळ केल्या प्रकरणी दानवे यांच्या निलंबनाचा प्रस्ताव बहुमताने संमत करत. पाच दिवसांच निलंबन विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचं करण्यात आल. या प्रस्तावा विरोधी विरोधी पक्षाने अक्षेप घेतला. संमत करण्यात आलेल्या निलंबनाच्या प्रस्तावावर विरोधी पक्षाला बोलून द्यावं. चर्चा व्हावी असा आग्रह विरोधी पक्षाने केला. मात्र निलंबनाच्या प्रस्ताव चर्चा होत नाही. तस कधी झालं देखील नाही. असे उपमुख्य मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषद सभागृहात सांगितले.

बहुमताच्या जोरावर हे सरकार कारवाई करू शकत नाही. आम्हाला बोलण्याची संधी द्यावी. अशी मागणी विरोधी पक्षाने केली. मात्र ही मागणी सभापतींनी अमान्य केली नाही. या नंतर "सभापती हाय हाय ...." अश्या घोषणा देत सभापती निलम गोऱ्हे यांच्या विरोधात विरोधी पक्षाने विधान परिषदेच्या सभागृहातील लॉबित येत गोंधळ घातला. या नंतर विरोधी पक्षाने सभा त्याग केला.

या प्रस्तावावेळी मंत्री अदिती तटकरे, मंत्री उदय सामंत, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विरोधी पक्ष व इतर आमदार उपस्थित होते.

Tags:    

Similar News