माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवर झालेले आरोप खोटे? चांदीवाल आयोगाचा अहवाल सुपूर्त
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख(Anil Deshmukh) यांच्यावर परमवीर सिंग(parambir singh) यांनी खंडणीचे आरोप केले होते.आता ते आरोप खोटे आहेत असं चांदीवाल आयोगाने सादर केलेल्या अहवालात स्पष्ट करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.आज म्हणजेच मंगळवारी चांदीवाल आयोगाचा अहवाल गृहमंत्री(Home minister) दिलिप वळसे पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपुर्द केला.
परमवीर सिंग यांनी लेटरबॉम्बमधून १०० कोटी रुपयांचा (100cr) आरोप अनिल देशमुखांवर केला होता.या आरोपाची चौकशी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने चांदीवाल आयोगाची (Chandiwal Commision) स्थापना केली होती.परमवीर सिंग यांनी देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपात तथ्य नसल्याचे आयोगाच्या अहवालात स्पष्ट झाल्याचे सांगण्यात येत आहे.
चांदीवाल आयोगाने सचिन वाझे यांच्यासह इतर पोलिस अधिकाऱ्यांच्या जबाब घेण्यात आल्या होत्या.आयोगाच्या अहवालातून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना आता क्लिनचिट मिळणार?त्यांची सुटका होणार का, अशा चर्चा सुरु झाल्या आहेत.
अनिल देशमुख यांनी पोलिसांना शंभर कोटी वसुलीचे टार्गेट दिले होते.असा खळबळजनक आरोप मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमवीर सिंह यांनी केला होता.परमवीर सिंह यांनी उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले होते.या पत्रानंतर देशमुखांना राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर देशमुखांच्या घरावर ईडी आणि आयकर विभागाची छापेमारी झाली होती. यामधून काही माहिती तपास यंत्रणांच्या हाती लागल्याची माहिती आहे. काही दिवस गायब असलेल्या अनिल देशमुख तीन महिन्यापूर्वी ईडीसमोर हजर झाले. त्यानंतर मध्यरात्री त्यांनी अटक करण्यात आली. देशमुखांनी खरंच पोलिसांच्या बदलीमध्ये घोटाळा केला आहे का?सचिन वाझे आणि अनिल देशमुखांची तपासणी केली जात होती.