छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयातील टेंडर प्रक्रियेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप

Update: 2024-01-19 06:26 GMT

शासकीय बनावट दस्तावेज वापरून कोल्हापूरच्या छ.प्रमिला राजे रुग्णालयात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप माहिती जिल्हाध्यक्ष जयराज कोळी यांनी पत्रकार परिषद घेऊन केला आहे. माहिती अधिकार कायद्याच्या अंतर्गत या रुग्णालयातील सर्जिकल स्टोअर विभागास भेट देऊन घेतलेल्या माहितीच्या आधारावर तसेच Gem पोर्टलवरून टेंडर प्रक्रिये संबंधी मिळवलेल्या माहितीच्या आधारे जयराज कोळी यांनी हा आरोप केला आहे.

काय आहेत आरोप

टेंडर प्रक्रियेमध्ये पाच कंपनीने सहभाग नोंदवलेला होता त्यात न्यूटन एंटरप्राइजेस यांना टेंडर मंजूर करण्यात आले आहे. परंतु या फर्म प्रोप्रायटर यांनी अन्न व औषध प्रशासनाचा बनावट परवाना तयार करून या टेंडर प्रक्रियेमध्ये सादर केल्याचा आरोप आहे.



कागदपत्रांची कोणतीही छाननी न करता संगनमताने हे टेंडर या न्यूटन इंटरपाईजेस यांना हेतूपर्वक देण्यात आल्याचा गंभीर आरोप अन्न व औषध प्रशासन विभागाला १८ डिसेंबर रोजी पत्रव्यवहार करून न्यूटन इंटरप्राईजेस प्रोप्रायटर अजिंक्य पाटील यांचे परवाना अथवा लायसन विषयी माहिती विचारले असता असे कोणतेही लायसन दिले नसल्याचे माहिती अधिकारात उत्तर मिळाले आहे.




सर्जिकल स्टोर मध्ये आलेले साहित्य न्यूटन कंपनीसोबत केलेल्या करारातील ब्रँडचे नसून इतर वेगवेगळ्या अनेक कंपन्यांचे आलेले आहे. तरीदेखील सर्जिकल स्टोर व्यवस्थापक यांनी ते स्वीकारलेल आहे. यात कराराचा भंग केलेला असून देखील कोणतीही कारवाई अथवा सूचना न्यूटन फर्म यांना दिलेली नाही. सदर टेंडर प्रक्रियेमध्ये खरेदी केलेले साहित्य व औषधे मार्केट रेटच्या कितीतरी पटीने जास्त असून हेतूपूर्वक मोठ्या दराची तफावत ठेवून खरेदी केले न्युटन इंटरप्राईजेस यांच्याकडे अन्न व औषध प्रशासनाचा परवाना नसल्याने कंपनीच्या वरती कायदेशीर कार्यवाही करण्याची मागणी. टेंडर प्रक्रियेचे बिल ई इन्व्हॉईस असावे लागते परंतु न्यूटन इंटरप्राईजेस यांनी एक्सेल शीट मध्ये बनवलेल्या कच्च्या बिलावर देयक अदा करण्यात आले आहे.

छत्रपती प्रमिला राजे रुग्णालय मधील टेंडर GEM/2023/B/368147 आणि GEM/2023/B/3968302 या खरेदी प्रक्रियेमधील अधिष्ठाता व खरेदी समितीतील सर्व सदस्यांनी मिळून हेतुपूर्वक न्यूटन इंटरप्राईजेस यांना कोणतेही अन्न औषध प्रशासनाचे लायसन नसताना देखील टेंडर हेतूपूर्वक मंजूर केले. छत्रपती प्रमिला राजे रुग्णालमधील टेंडरमध्ये सहभागी होण्यासाठी न्यूटन इंटरप्राईजेस प्रोप्रायटर अजिंक्य पाटील यांनी हेतूपूर्वक शासकीय बनावट दस्तावेज बनवून सदर करोडो रुपयाच्या टेंडरचा लाभ घेतला.

वरील आरोप करत दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

या पत्रकार परिषदेसाठी पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष अमरनाथ शेणेकर,शरद पोवार,रणजित मोरे,अमृत पाटील, अनीस मुजावर,विनायक सुतार आदी मान्यवर उपस्थित होते.

Similar News