ग्रामपंचायतींच्या मासिक सभांबाबत मोठा निर्णय

Update: 2021-03-13 14:18 GMT

ग्रामपंचायतीच्या मासिक सभांमध्ये आता सर्वसामान्य ग्रामस्थांना सहभागी होता येणार आहे. या सभानां ग्रामस्थांना बसता यावे यासाठी पालघर जिल्ह्यातील एका तरुणाने ग्रामविकास विभागाकडे पाठपुरावा केला होता. त्यांच्या लढ्याला अखेर यश मिळाले आहे. ग्रामविकास विभागाने आता ग्रामस्थांना मासिक सभांना बसण्यास कोणी अडथळा आणू नये असे आदेश काढले आहेत. अशी माहिती सरपंच सेवा महासंघातर्फे देण्यात आली आहे. ह्याबाबत उचित कार्यवाही करण्याचे आदेश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यात आहेत,

हा आदेश राज्यातील सर्व ग्रामपंचायतींना लागू असेल. ग्रामस्थांच्या सहभागातून ग्रामपंचायता कारभार अधिक पारदर्शक व्हावा म्हणून राज्य शासनाने १९ सप्टेंबर १९७८ रोजी शासकीय परिपत्रक काढले होते. परंतु ग्रामपंचायत सदस्य एकमताने ठराव मंजूर करून ग्रामस्थांना मासिक सभांना उपस्थित राहण्यास विरोध करत होते. परंतु वारंवार पाठपुरावा केल्यामुळे पालघर जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी ग्रामविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिवांना याबाबच विचारणा केली होती. त्यांनी १ मार्च रोजीचा दिलेल्या पत्रात ग्रामसभांना उपस्थित राहण्याबाबत तरतूद नियमातच आहे, असे सांगितले. त्यामुळे आता सर्व ग्रामपंचायतींमधील ग्रामसभांमध्ये ग्रामस्थांना आता उपस्थित राहता येणार असून, ग्रामपंचायतीच्या कारभारावर लक्ष ठेवता येणार आहे.



Tags:    

Similar News