...अन्यथा औरंगाबाद शहरात 'नाइट कर्फ्यू' लावला जाईल; पोलीस आयुक्तांचा इशारा

Update: 2021-02-18 13:10 GMT

शहरात कोरोनाचे रुग्ण असेच वाढत राहिले तर, नाइट कर्फ्यू लावण्याचा निर्णय घेतला जाईल. असा इशारा औरंगाबादचे पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांनी दिला आहे. औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यात कोरोनाचा वाढत आकडा लक्षात घेत जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनाकडून संयुक्त पत्रकार परिषद घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते.

लोकांनी कोरोनाचे नियम पाळावे तसेच मास्क वापरावे. असे आवाहन निखिल गुप्ता यांनी केले. तसेच गांभिर्य लोकांपर्यंत पोहचावे म्हणून ही पत्रकार परिषद घेत आहे. तसेच लोकांनी सुद्धा स्वतः जवाबदारी घ्यायला हवी असेही गुप्ता म्हणाले.

तसेच औरंगाबाद महानगरपालिका हद्दीतील शाळेत पाचवी ते बारावीपर्यंत मात्र दहावी आणि वर्गातील विद्यार्थी सोडून इतर विद्यार्थ्यांना शाळेत न येण्याची सूट देण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतला आहे. 28 फेब्रुवारीपर्यंत हे आदेश लागू राहणार आहे. तर दहावी आणि बारावी परीक्षा असल्याने ते शाळेत येऊ शकतात, इतर विद्यार्थ्यांनी शाळेत येऊ नये, तसेच शाळेने विद्यार्थ्यांना बंधन घालू नये अशी माहिती औरंगाबाद महानगरपालिका आयुक्त अस्तिक पांडे यांनी दिली आहे.

अन्यथा गुन्हा दाखल केला जाईल उद्या साजरी होणाऱ्या शिव जयंती बाबत प्रशासनाने जाहीर केलेल्या नियमांचे पालन केले जावे. तसेच शिव जयंती निमित्ताने कुणी मिरवणूक काढल्यास गुन्हा दाखल केला जाईल असेही पोलीस आयुक्त म्हणाले.

Tags:    

Similar News