आमदारांचं चांगभलं! अजित पवार यांच्या घोषणेने सर्वपक्षीय आमदार खुश

Update: 2021-03-10 15:59 GMT

आज राज्य विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपले. यावेळी अजित पवार यांनी अर्थसंकल्पीय मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना सर्वपक्षीय आमदारांना खूश करण्याचा प्रयत्न केला.

अजित पवार यांना कोरोना काळात आमदारांच्या वेतनात केलेली कपात पूर्ववत करत असल्याची घोषणा केली. कोरोनाच्या काळात आमदारांच्या वेतनात 30 टक्के कपात केली होती. "1 मार्चपासून सर्व आमदारांचं वेतन पूर्ववत करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. वर्षभर आमदारांनी 30 टक्के वेतन सोडलं होतं. करोना काळात या प्रकारचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, आता हे वेतन पूर्ववत केलं जाईल."

असं म्हणत अजित पवार यांनी आमदारांचे वेतन पुर्ववत करण्याचा निर्णय घेतला आहे. 

एकीकडे देशात खासदार निधी आणि आमदारांच्या निधीत कपात केली जात असताना, अजित पवार यांनी आमदारांच्या निधीत एक कोटीची वाढ केली आहे. आता आमदारांना प्रति वर्षी विकास निधीसाठी 4 कोटी दिले जाणार आहेत. 

या संदर्भात अजित पवार यांनी विधानसभेत घोषणा केली आहे.

. "करोना काळात स्थानिक विकास निधीला कट लावलेला नाही. शेवटच्या काळात ३ कोटी रुपये आमदार निधीदेखील सगळ्यांना देण्याची सोय केली. सरकार कुणाचंही असलं, तरी आमदार निधी सगळ्यांसाठी महत्त्वाचा असतो. यंदाच्या वर्षी करोनाचं संकट असलं, तरी आमदार निधी ४ कोटी रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी ३५० कोटी रुपये जातील, मात्र, त्याची तरतूद केली जाईल".

यावेळी आमदारांच्या गाडीसाठी पण काही निधी देऊन टाका दादा असं भास्कर जाधव म्हणाले. त्यावर आमदारांच्या गाडी करता जे करायचं ते फाईलवर करतो, सगळ्या महाराष्ट्राला कळायला नको, असं अजित पवार म्हणाले.

Tags:    

Similar News