कोरोना संपेपर्यंत अहमदनगरच्या 'या' तालुक्यातील सर्व मंगल कार्यालये राहणार बंद
अहमदनगर जिल्ह्यातील वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभुमीवर जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी मंगल कार्यालये बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.;
अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रूग्णसंख्येचे पार्श्वभुमीवर जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी महत्वाचा निर्णय घेतला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर आणि संगमनेर तालुक्यात कोरोना रूग्णांची संख्या अधिक आहे. याच पार्श्वभुमीवर जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी संगमनेर तालुक्याचा दौरा केला. यावेळी बोलतांना त्यांनी कोरोना संपेपर्यंत संगमनेर तालुक्यातील सर्व मंगल कार्यालये बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत त्यांनी प्रांत अधिकारी आणि तहसिलदारांना आदेश दिले आहेत. साकुर गावात आढावा घेत असतांना त्यांनी हा निर्णय घेतला आहे.
अहमदनगर जिल्ह्यात सध्या दररोज हजार ते बाराशे कोरोना रूग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे जिल्ह्यात कोरोना नियमांची कडक अंमलबजावनी करण्याच्या सुचना जिल्हाधिकाऱ्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.
संगमनेर तालुक्यातून मोठ्या प्रमाणावर शेतकरी मुंबई तसेच नाशिककडे भाजीपाला घेऊन जातात. असा शेतकरी तसेच वाहन चालकांचे विलगीकरण तसेच कामासाठी बाहेर जाणाऱ्या मजुरांची कोरोना चाचणी सुरू करण्यात येणार आहे. दरम्यान जिल्हाधिकारी भोसले यांनी नागरिकांना कोरोना नियम पाळण्याचे आवाहन केले आहे. सोबतच नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी संगमनेरच्या साकुर गावात आढावा बैठक घेतली त्यावेळी प्रशासकीय अधिकारी, गावचे सरपंच, आरोग्य कर्मचारी, महसुल कर्मचारी उपस्थित होते.