नेहमीच सडेतोड भूमिकेसाठी प्रसिद्ध असलेले विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित दादा पवार अधिकारी आणि आमदारांना खडसावायला कधीही मागेपुढे पाहत नाही. त्याचाच प्रत्यय आज विधानसभा कामकाजात आला, चूक झालेल्या अधिकाऱ्याला आणि आमदाराला त्यांनी चांगलंचं त्यांनी दादा शैलीमध्ये खडसावले. विधिमंडळाचा अधिवेशन सुरू झाल्यापासून अजित दादा पूर्णवेळ सभागृहात उपस्थित असतात अनेक मुद्द्यांवर सरकारला अडचणीत आणण्याची संधी देखील त्यांनी सोडलेली नाही.
विधानसभेत आज (मंगळवारी) लक्षवेधीवर चर्चा सुरू असताना लक्षवेधी क्रमांक दोन मध्ये अधिकाऱ्यांकडून विधानसभेऐवजी विधानपरिषद असं लिहण्यात आलं. यावरून यावरून अजित पवारांनी अधिकाऱ्यांना चांगलेच सुनावले. "आपण सर्वच इथे रात्रीपर्यंत काम करतो. मात्र, आता दुसऱ्या लक्षवेधीकडे बघितलं तर यात 'महाराष्ट्र विधानपरिषद नियम १०१ अन्वये लक्षवेधी सुचना' असे लिहिले आहे. आपण विधानसभेत काम करतो, विधानपरिषदेत नाही, ही ज्याची कोणीची चूक आहे, त्याने यावर दिलगीरी व्यक्त करावी, तुम्ही फुकट काम करत नाही, यासाठी तुम्हाला सरकार सातवा वेतन आयोग देते, यापुढे अशी चुक झाल्यास सरकारने त्यांना निलंबित करावे", असे अजित पवार म्हणाले.
त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खास असलेले आमदार अभिमन्यू पवारांनाही सुनावले.विधानसभेत आपल्याला प्रश्न विचारू दिला नाही, या मुद्द्यावरून अभिमन्यू पवार संताप व्यक्त करत होते. त्यांनी थेट तालिका अध्यक्षांनाच जाब विचारायला सुरुवात केल्यामुळे अजित पवारांचा संताप झाला.
"मला का बोलू दिलं नाही? मी काय वाईट केलंय तुमचं? मी सकाळी सकाळी आंघोळ करून एवढ्या सकाळी आलो. मला का बोलू दिलं नाही एवढं सांगा", असं अभिमन्यू पवार बोलत होते.
अभिमन्यू पवार यांचा आवाज चढताच त्यांना समज देण्यासाठी लागलीच अजित पवार उभे राहिले. "अभिमन्यू पवारांना विनंती आहे की असं तालिका अध्यक्षांना धमकावू नका. तुम्ही एकेकाळी सरकारमध्ये कामं केली आहेत. तुमच्याकडून अशी अपेक्षा नाही. फडणवीस आणि सांगितल्यावर तुम्ही गप्प बसता .
तुमच्यावर अन्याय झाला असेल, पण तुम्ही वेगळी आयुधं वापरा. अशा पद्धतीने कुणालातरी धमकावणं योग्य नाही", असं अजित पवार म्हणाले