अजित पवारांच्या आदेशाला अधिकाऱ्याची केराची टोपली, MPSC च्या विद्यार्थ्यांचं भवितव्य टांगणीला

सरकार अजून एक स्वप्निल लोणकर होण्याची वाट पाहत आहे का? MPSC च्या विद्यार्थ्यांचा संताप;

Update: 2021-11-27 13:16 GMT

महाराष्ट्रातील स्वप्निल लोणकर Swapnil Lonkar या 24 वर्षीय MPSC च्या (राहणार पुणे फुरसंगी) विद्यार्थ्याने आत्महत्या केल्यानंतर अजित पवार यांनी 31 जुलै पर्यंत MPSC च्या सर्व जागा भरल्या जाणार. अशी घोषणा विधानभवनात केली होती. मात्र, त्यांची ही घोषणा हवेतच विरली आहे. आता डिसेंबर उजेडायची वेळ आली आहे. मात्र, तरीही महाराष्ट्र सरकार अजुनही या मुलांना ऑर्डर देत नाही. सरकार आता दुसरा स्वप्नील लोणकर होण्याची वाट पाहत आहे का? असा सवाल एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी केला आहे.

खरं तर अजित पवार यांची ओळख ही शब्दाला जागणारा नेता अशी आहे. मात्र, अजित पवार यांनीच शब्द पाळला नाही. अशी भावना आता विद्यार्थ्यांच्या मनात आहे. अजित पवार यांनी प्रशासनाला तशा सूचना दिल्या होत्या. मात्र, प्रशासनाने अजित पवार यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे.

Full View

विशेष म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गेल्या महिन्यात नियुक्तीच्या फाईलवर सही केली असल्याचं समजतंय. मात्र, सामान्य प्रशासन विभागाच्या सुजाता सौनिक यांनी कागद पडताळणी, वैद्यकीय तपासणी झाल्यानंतरच मी नियुक्ती देईल. अशी भूमिका घेतली आहे. त्यांच्या या आडमुठ्या भूमिकेने विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

एका ग्रामीण भागातील विद्यार्थ्याने सौनिक यांच्या भूमिकेवर प्रश्न चिन्ह उपस्थित केलं आहे. विद्यार्थ्यांच्या मते या अगोदरच्या नियुक्त झालेल्या सर्व बॅचेसची कागदपत्रे पडताळणी व वैद्यकीय तपासणी नियुक्ती झाल्यानंतरही झाल्या आहेत. लवकरच नियुक्ती दिली जाईल असा सांगितलं जातं. आमच्या बॅचवर असा अन्याय का? अशी प्रतिक्रिया विद्यार्थ्याने दिली आहे.

MPSC परीक्षा पास होऊनही 413 विद्यार्थ्यांना अद्यापर्यंत नियुक्त्या मिळालेल्या नाहीत. या विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्या करण्याची परवानगी मागितली आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा अंतिम निकाल लागून एक वर्ष पूर्ण झालं तरी या भावी अधिकाऱ्यांना अद्यापर्यंत नियुक्ती देण्यात आलेली नाही. 1 वर्षापासून या भावी अधिकाऱ्यांच्या पोस्टींग थांबल्याने या सर्व विद्यार्थ्यांच्या आयुष्याचं चाक थांबलं आहे. कोणी शेतात काम करत आहेत. तर कोणी लोकांच्या घरी शेतात काम करत आहे. कोणी फळ विकण्याचा धंदा करत आहे. उच्च शिक्षित असून लॉकडाऊनच्या काळात या विद्यार्थ्यांना मिळेल ते काम करावी लागत आहेत.

अनेकांची लग्न थांबलं आहेत. मुलांचं एक वेळेस ठीक आहे. मात्र, मुलींना पोस्टींग न मिळाल्यानं मुलींसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. सरकारी अधिकारी झाल्या असतानाही घरचे आता त्यांच्यावर लग्नासाठी आग्रह धरत आहेत.

मराठा आरक्षणाच्या आड सरकार सरकारने या नियुक्त्या दिलेल्या नव्हत्या. पण आज मराठा आरक्षणाचा निकाल लागून (5 मे 2021) 6 ते 7 महिने झाले तरी अद्यापपर्यंत या भावी अधिकाऱ्यांना नियुक्त्या देण्यात आलेल्या नाहीत. यातील अनेक विद्यार्थी ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातील आहेत. त्यांनी पुण्यासारख्या ठिकाणी पाच ते सहा वर्षे अभ्यास करून अत्यंत हलाखीत दिवस काढले आहेत.

एक पोस्ट मिळवण्यासाठी 5 ते 6 वर्ष अभ्यास करणारे हे विद्यार्थ्यांना एक पोस्ट मिळवण्यासाठी परीक्षा जाहीर झाल्यापासून साधारण 1 ते 1.5 वर्ष लागते. मात्र, या विद्यार्थ्यांचा जाहिरात सुटल्यापासून कालावधीचा विचार केला तर तीन वर्ष पूर्ण झाले आहेत.

या परिक्षेची जाहिरात डिसेंबर 2018 मध्ये सुटली होती. पूर्व परीक्षा फेब्रुवारी 2019 मध्ये तर मुख्य परीक्षा फेब्रुवारी जुलै 2019 मध्ये या परिक्षेच्या मुलाखती फेब्रुवारी 2020 मध्ये तर अंतिम निकाल 19 जून 2020 ला लागला होता. त्यामुळं येत्या 19 जूनला परीक्षेचा निकाल लागला तरी या भावी अधिकाऱ्यांना नियुक्त्या न दिल्यानं या विद्यार्थ्यांनी आत्महत्याचा इशारा सरकारला दिला आहे. स्वप्नील प्रमाणे हे विद्यार्थी देखील निराशेच्या गर्तेत अडकले आहे. त्यामुळं सरकारने याबाबत त्वरीत निर्णय घेणं गरजेचं असल्याचं मत व्यक्त केलं जात आहे.

Tags:    

Similar News