"इस्लामचा क्रिकेटशी काय संबंध?,आपला शेजारी वेडा आहे"; असदुद्दीन ओवेसींचे पाक मंत्र्याला प्रत्युत्तर

facebooktwitter-greylinkedin
Update: 2021-10-28 03:36 GMT
"इस्लामचा क्रिकेटशी काय संबंध?,आपला शेजारी वेडा आहे"; असदुद्दीन ओवेसींचे पाक मंत्र्याला प्रत्युत्तर
  • whatsapp icon

मुझफ्फरनगर : एआयएमआयएम पक्षाचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी पाकिस्तानचे गृहमंत्री शेख रशीद यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. शेख रशीद यांनी भारत पाक सामन्यानंतर भारताविरुद्ध पाकिस्तानचा विजय इस्लामचा विजय आहे असं वक्तव्य होते. याबाबत आश्चर्य व्यक्त करत असदुद्दीन ओवेसी यांनी क्रिकेट सामन्याशी इस्लामचा काय संबंध आहे, असा प्रश्न केला. इम्रान सरकारमधील मंत्री शेख रशीद हे वेडे आहेत त्यांना काहीच समजत नसल्याचे ओवेसी यांनी म्हटले आहे.

उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरमध्ये एका जाहीर सभेत बोलताना ओवेसी यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. "आपल्या शेजारी देशाचा एक मंत्री वेडा आहे बिचारा. पाकिस्तानचा विजय हा इस्लामचा विजय असल्याचे ते म्हणाले. मात्र, शेजारच्या देशांना काही कळत नाही. शेवटी इस्लामचा क्रिकेटशी काय संबंध? अल्लाचे आभार माना की आमचे वडील तिथे (पाकिस्तान) गेले नाहीत, नाहीतर आम्हाला या वेड्यांना बघावे लागले असते," असे ओवेसी यांनी म्हटले आहे.

टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारताला कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध १० विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतर पाकिस्तानचे गृहमंत्री शेख रशीद यांनी प्रतिक्रिया देताना भारतीय मुस्लिमांसह जगभरातील सर्व मुस्लिम आनंद साजरा करत आहेत. क्रिकेटचा उल्लेख युद्ध म्हणून करत त्यांनी भारताविरुद्धचा हा विजय संपूर्ण इस्लामचा विजय असल्याचे म्हटले होते. त्यावर ओवेसी यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

Tags:    

Similar News