एमआयएमने केली संभाजी भिडेची तुलना थेट अजमल कसाबशी

शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे सर्वेसर्वा संभाजी भिडे आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे कायम चर्चेत असतात. त्यातच संभाजी भिडे यांनी इस्लाम हा देशाचा पहिल्या क्रमांकाचा शत्रू असल्याचे वक्तव्य केले होते. त्यावर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलिल यांनी प्रतिक्रीया दिली आहे.;

Update: 2022-03-19 03:59 GMT

शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे सर्वेसर्वा संभाजी भिडे आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे कायम चर्चेत असतात. त्यातच संभाजी भिडे यांनी इस्लाम हा देशाचा पहिल्या क्रमांकाचा शत्रू असल्याचे वक्तव्य केले होते. त्यावर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलिल यांनी प्रतिक्रीया दिली आहे.

आपल्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी प्रसिध्द असलेल्या संभाजी भिडे यांनी पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना इस्लाम हा देशाचा प्रमुख शत्रू असल्याचे वादग्रस्त वक्तव्य केले होते. तर संभाजी भिडेला पुणे जिल्हाबंदी करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यापाठोपाठ एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी संभाजी भिडेवर निशाणा साधला आहे.

औरंगाबादचे खासदार जलील म्हणाले की, अजमल कसाबने बंदुकीच्या जोरावर आपला देश कमकुवत करण्याचा प्रयत्न केला होता. त्याप्रमाणेच संभाजी भिडे आपल्या जीभेच्या जोरावर देशाला कमजोर करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे दहशतवादी अजमल कसाब आणि संभाजी भिडे हे दोन्हीही एकाच प्रकारचे लोक आहेत. कारण अशा प्रकारच्या लोकांचा उद्देश देशाला कमजोर करणे हा असतो. तसेच यातून समाजात कशी तेढ निर्माण करता येईल, असा प्रयत्न संभाजी भिडेसारखे लोक करतात. तसेच भिडे हा गुरूजी होऊ शकत नाही. कारण लोकांना चांगलं ज्ञान देणाऱ्या माणसाला गुरूजी असं आपण म्हणतो. मात्र संभाजी भिडे हा समाजात दुहीची बीजं पेरत असल्यामुळे त्याला गुरूजी म्हणता येणार नाही, अशी प्रतिक्रीया इम्तियाज जलील यांनी व्यक्त केली.


Tags:    

Similar News