Budget Season 2022 : ओवैसींनी झेड सेक्युरिटी नाकारली
AIMIM चे खासदार असदुद्दीन ओवैसींच्या गाडीवर झालेल्या गोळीबारानंतर त्यांना झेड सेक्युरिटी देण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार ओवैसींना झेड सेक्युरिटी देण्याचे केंद्र सरकारने जाहीर केले होते. त्यापार्श्वभुमीवर संसदेच्या अर्थसंकल्पिय अधिवेशनात बोलताना ओवैसींनी झेड सेक्युरिटी नाकारली.
उत्तरप्रदेशातील छजारसी भागातून जात असताना ओवैसींच्या गाडीवर गोळीबार करण्यात आला होता. त्यानंतर देशात एकच खळबळ उडाली. त्यावरून एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांना झेड सुरक्षा देण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र ओवैसींनी लोकसभेत बोलताना झेड आपण झेड सेक्युरिटी नाकारच असल्याचे म्हटले.
उत्तरप्रदेश निवडणूकीच्या प्रचारादरम्यान हापुर गाझियाबाद राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करत असताना AIMIM चे खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्या गाडीवर गोळीबार झाल्याची घटना घडली होती. तर ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याने दोन आरोपींना अटक करण्यात आली होती. तर या घटनेनंतर केंद्रीय गृह मंत्रालयाने खासदार असदुद्दीन ओवैसी यांना झेड सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र अर्थसंकल्पिय अधिवेशनात बोलताना ओवैसींनी आपण झेड सुरक्षा नाकारत असल्याचे म्हटले.
असदुद्दीन ओवैसींच्या गाडीवर हल्ला झाल्याच्या पार्श्वभुमीवर त्यांना झेड सुरक्षा देण्याचा निर्णय केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाने घेतला होता. त्यावरून केंद्र सरकारने दिलेली झेड सुरक्षा नाकारत ओवैसी म्हणाले की, मला सुरक्षा देण्यापेक्षा देशातील गरीब आणि सामान्य माणसाला सुरक्षा द्या, असे मत व्यक्त केले. तसेच पुढे बोलताना ओवैसी म्हणाले की, मी जेव्हा मरेल तेव्हा औरंगाबादच्या भुमीत माझा दफनविधी करावा. तर मला सुरक्षेच्या जाळ्यातील नव्हे तर बोलण्या वागण्यासह मुक्त फिरण्याचे स्वातंत्र्य हवे आहे. तसेच मी जीवंत असेल तर मला सरकारच्या विरोधात बोलावं लागेल. त्यामुळे गोळी लागली तर मला मान्य आहे. पण मी कुढत कुढत जगू शकत नाही. त्यामुळे मला झेड सुरक्षा नको, असे मत ओवैसी यांनी व्यक्त केले.
देशातील गरीबांना, अल्पसंख्यांकांना सुरक्षा द्या. कारण देशात सर्व समान आहेत. त्यामुळे गरीब, अल्पसंख्यांक सुरक्षित असेल तर देश सुरक्षित राहिल, असे म्हणत देशात गोळीला प्रेमाने उत्तर दिले जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
यावेळी बोलताना ओवैसी म्हणाले की, हे कोण लोक आहेत, जे मतपेटीवर नाही तर गोळीवर विश्वास ठेवतात. हे कोण लोक आहेत ज्यांना संविधानावर विश्वास नाही, असा सवाल विचारत अशा घटनांमुळे देशाचे मोठे नुकसान होईल, अशी भीतीही यावेळी ओवैसींनी व्यक्त केली.