Ahmednagar hospital fire: जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा निलंबित
अहमदनगर जिल्हा रुग्णालयात लागलेल्या आगीत 11 लोकांचा मृत्यू झाला होता. या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करून आठ दिवसांच्या आत अहवाल सादर करण्याचे आदेश सरकारने दिले होते. यावर आज सरकारने तातडीची कारवाई म्हणून जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा यांच्यासह डॉ.सुरेश ढाकणे, डॉ. विशाखा शिंदे आणि स्टाफ नर्स सपना पठारे यांना निलंबित केले आहे. तर स्टाफ आस्मा शेख आणि स्टाफ चन्ना आनंत यांची सेवा संपुष्टात आणली आहे.
तसेच या प्रकारच्या घटना वारंवार होऊ नये. यासाठी फायर सेफ्टी ऑडीट साठी वेगळा निधी उपलब्ध करून देण्याची तरतूद केली जाईल. सर्व जिल्हा रुग्णालयांच्या आपत्ती व्यवस्थापन पूर्वतयारीचा आढावा घेण्यात येईल, अशी माहिती राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आज येथे दिली.