अहमदनगर: जिल्हा रुग्णालयातील कोविड रुग्णांसाठी उभारण्यात आलेल्या अतिदक्षता विभागाचा आज सकाळी आग लागली. या विभागात एकूण 17 रुग्ण होते. यात सुमारे 10 रुग्णांचा गुदमरून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. परंतु त्याची अधिकृत माहिती जिल्हा रुग्णालय प्रशासनाने सांगितली नाही.
अतिदक्षता विभागाला आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. एमआयडीसी आणि महापालिकेच्या अग्निशामक दलांनी ही आग विझवली. आमदार संग्राम जगताप यांनी जिल्हा रुग्णालयाला भेट दिली असून आरोग्य मंत्री राजेश टोपे व पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना घटनेची माहिती दिली आहे. पोलिस अधिक्षक मनोज पाटील यांनी देखील घटनास्थळाला भेट देऊन जिल्हा रुग्णालयाच्या भागात पोलिस बंदोबस्त वाढवला आहे.
तोफखाना पोलीस ठाण्याच्या निरीक्षक ज्योती गडकरी, कोतवालीचे निरीक्षक संपत शिंदे, शहर वाहतूक शाखेचे निरीक्षक राजेंद्र भोसले, कॅम्प पोलीस स्टेशनचे शिशिरकुमार देशमुख हे घटनास्थळी दाखल आहेत.