अहमदनगर जिल्हा रुग्णालय दुर्घटना : चारही आरोपींना जामीन मंजूर

Update: 2021-11-19 12:04 GMT

अहमदनगर// अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागाला लागलेल्या आगप्रकरणी येथील तोफखाना पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या सदोष मनुष्यवधाचा गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या वैद्यकीय अधिकारी व तीन परिचारिका यांचा जामीन मंजूर झाला आहे. वैद्यकीय अधिकारी विशाखा शिंदे, परिचारिका सपना पठारे, आस्मा शेख आणि चन्ना आनंत यांचा जामीन मंजूर झाला आहे.

जिल्हा रुग्णालयातील परिचारिका संघटनांनी परिचारिकांना या गुन्ह्यात अटक केल्याने या अटकेच्या कारवाईचा निषेध नोंदवला होता. ही कारवाई एकतर्फी असल्याचा आरोप डॉक्टर संघटना, परिचारिका संघटनांनी केला होता. सोबतच या प्रकरणातील प्रमुख सुत्रधाराला अटक करण्याची मागणी केली होती. शनिवारी (६ नोव्हेंबर) जिल्हा रुग्णालयातील कोरोना अतिदक्षता विभागाला आग लागली होती . या दुर्घटनेत बारा रुग्णांचा मृत्यू झाला असून पाच जण गंभीर जखमी झाले आहे. या प्रकरणाची गंभीर दखल राज्य सरकारने घेतली असून जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा यांच्यासह सहा जणांवर कारवाई करण्यात आली होती. याप्रकरणी तीन जणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये चार आरोपींना अटक आली होती. दरम्यान आज या चारही आरोपींना जामीन मंजूर झाला आहे.

परिचारिका सपना पठारे, आस्मा शेख आणि चन्ना आनंत यांच्या वतीने ॲड. महेश तवले तर विशाखा शिंदे यांच्या वतीने ॲड. योहान मकासरे यांनी बाजू मांडली तर सरकारी पक्षाच्या वतीने ॲड.अनिल ढगे यांनी बाजू मांडली. यावेळी तपासी अधिकारी संदीप मिटके हजर होते. ॲड. महेश चौगुले यांनी बाजू मांडताना सांगितले की, जेव्हा घटना घडली त्यावेळी या प्रकरणातील शिंदे , पठारे आणि आनंत यांनी वॉर्डमधील रुग्णांना वाचवण्याचा प्रयत्न केला तसेच कंत्राटी कामगार असल्यामुळे आस्मा शेख व आनंत यांचा कार्यकाल संपल्यानंतरही मदतनीस म्हणून जिल्हा शल्यचिकित्सक यांनी दिलेल्या आदेशामुळे ते कामावर हजर होते. त्यामुळे या प्रकरणात यांचा कोणताही दोष नाही दरम्यान युवान मकासरे यांनी बाजू मांडताना सांगितले की, या प्रकरणातील विशाखा शिंदे या शिकाऊ डॉक्टर असून त्या या ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी आल्या आहेत. त्यामुळे आरोग्य मंत्र्यांनी आधी त्यांचे आरोग्य अधिकारी म्हणून निलंबन केले होते. मात्र चूक लक्षात येताच निलंबन रद्द केल्याचं न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. त्यामुळे या प्रकरणात जामीन मिळावा अशी मागणी केली. सरकारी वकील अनिल ढगे यांनी या जामीन अर्जावर आक्षेप घेत जामिनीला तीव्र विरोध दर्शवला तर संदीप मिटके यांनी काही अटी शर्तींवर जामीन द्यावा अशी मागणी न्यायालयाकडे सादर केली होती. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद झाल्या नंतर न्यायालयाने चार आरोपींचा जामीन अर्ज काही अटी शर्तींवर मंजूर करण्यात आला . पोलिसांना सहकार्य करणे आणि जिल्हा न सोडण्याच्या अटीवर न्यायालयाने आरोपींना जामीन दिला आहे.

Tags:    

Similar News