शेतीत वाढला तोटा, पी. साईनाथ यांच्यासह किसान सभेचा मोर्चा

सध्या देशातील शेती संकटात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये वाढ आहे. त्यामुळे शेतीवरील संकटाकडे लक्ष वेधण्यासाठी विचारवंत आंदोलनात सहभागी होणार आहेत.

Update: 2023-04-25 05:59 GMT

गेल्या काही वर्षांमध्ये शेतकरी आत्महत्या वाढल्या आहेत. त्यातच अनेक शेतकरी शेतीकडे पाठ फिरवत आहेत. त्यामुळे या शेतीच्या संकटाकडे लक्ष वेधण्यासाठी देशातील विचारवंत अकोले ते लोणी या किसान सभेच्या मोर्चात सहभागी होणार आहेत.

कृषी संकटामुळे निर्माण झालेल्या विविध प्रश्नांमुळे देशभरात शेतकरी आत्महत्या वाढत आहेत. शेतकऱ्यांना शेती सोडावी लागत आहे. देशभरात बहुसंख्य शेतकरी केवळ योग्य पर्याय नसल्यामुळे शेतीतील तोटा सहन करत शेती करत आहेत. केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांमुळेच ही आपत्ती शेतकऱ्यांवर ओढवली आहे. कॉर्पोरेटधार्जिण्या धोरणांचा त्याग करून तसेच शेतकरी, शेतमजूर, महिला, ग्रामीण श्रमिककेंद्री कृषी धोरणांचा स्वीकार करूनच शेती संकट संपविता येईल, हे लक्षात घेऊन सरकारने धोरणं ठरवायला हवेत. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारचे या शेतीतील मुलभूत मुद्द्याकडे लक्ष वेधण्यासाठी किसान सभेच्या नेतृत्वात 26 ते 28 एप्रिल हे तीन दिवस अकोले ते लोणीपर्यंत पायी मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात रेमन मॅगेसेस पुरस्कार प्राप्त लेखक पी. साईनाथ, ज्येष्ठ कृषी अर्थतज्ज्ञ रामकुमारर, उत्तर भारतातील लोकप्रिय शेतकरी नेते व लेखक सरोज बादल, माकपचे आमदार विनोद निकोले हे या मोर्चात सहभागी होणार आहेत.

किसान सभेने या राज्याचे महसूल व दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या लोणी येथील कार्यालयावर मोर्चाचे आयोजन केले आहे. या मोर्चातील मागण्या मान्य न झाल्यास लोणी येथे बेमुत महामुक्काम आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती किसान सभेने दिली.

Tags:    

Similar News