पहाटे पाच वाजता इस्लामपूर येथे एस. टी. कामगारांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन

Update: 2021-11-06 03:30 GMT

इस्लामपुर : आज पहाटे पाच वाजता इस्लामपूर येथे एस. टी. कामगारांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले.एस. टी. कामगारांच्या विविध मागण्यांसाठी जे महाराष्ट्रभर आंदोलन सुरू आहे. त्यात इस्लामपूर डेपोतील कामगारांनी सामील व्हावे, यासाठी इस्लामपूर डेपोमध्ये हे आंदोलन करण्यात आले. तसेच या आंदोलनात ३७ कामगारांनी आपला जीव गमावला आहे. या शहीद झालेल्या कामगारांना रयत क्रांती संघटनेकडून श्रद्धांजली वाहण्यात आली.

इस्लामपुरातून पहिली एस.टी पहाटे पाच वाजता निघते. त्या एस.टी चालवणाऱ्या चालकांचा आणि कंडक्टरचा सत्कार करून आपण या आंदोलनास पाठिंबा द्यावा हि विनंती केल्यानंतर कामगारांनी पाठिंबा देऊन इस्लामपूर डेपो बंद करून या आंदोलनास पाठिंबा दर्शविला. यावेळी रयत क्रांती संघटनेचे युवा नेते सागर खोत यांच्यासह संघटनेचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags:    

Similar News