गेल्या अनेर महिन्यांपासून रखडलेली प्राध्यापक भरती सुरू करण्याच्या मागणीसाठी राज्यभरात विविध संघटनांनी आंदोलन सुरू केले आहे. नागपूरमध्ये शिक्षणक्रांती संघटनेतर्फे उच्चशिक्षण विभागाच्या सहसंचालकांच्या कार्यालयाबाहेरही आंदोलन करण्यात आले. पात्रताधारक बेरोजगार युवक- युवतींना लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा, तसेच प्राध्यापक भरती गुणवत्तापूर्ण, पारदर्शक आणि भ्रष्टाचारमुक्त पद्धतीने व्हावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.
कोरोनामुळे रखडलेली प्राध्यापक भरतीची प्रक्रिया सुरु करण्याची घोषणा उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केली होती. पण दीड महिना उलटूनही निर्णय़ घेतला गेला नसल्याची आंदोलक प्रा. विवेक कोरडे यांनी सांगितले.