BBC IT Raid : The Modi question डॉक्युमेंटरीनंतर BBC कार्यालयावर छापा, अघोषित आणीबाणीचा काँग्रेसचा आरोप

गुजरात दंगलीविषयीच्या डॉक्युमेंट्रीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल प्रश्न उपस्थित केल्यानंतर या डॉक्युमेंट्रीवर सरकारने बंदी घातली. त्यापाठोपाठ आता मोदी सरकारने BBC वर कारवाई करून लोकशाहीचा गळा आवळण्यास सुरुवात केली आहे.;

Update: 2023-02-14 08:09 GMT

BBC IT Raid : बीबीसीने (BBC Documentary) तयार केलेल्या माहितीपटावरून देशात वादळ निर्माण झाले होते. त्यानंतर सरकारने बीबीसीने प्रसिध्द केलेला द मोदी क्वेशन (The Modi question) हा माहितीपट सर्व सोशल मीडियावर प्लॅटफॉर्मवरून काढून टाकण्याचे आदेश देण्यात आले होते. सध्या माहितीपटासंदर्भातील याचिका सर्वोच्च न्यायालयात (Supreme court) प्रलंबित आहे. दुसरीकडे आयकर विभागाने बीबीसीच्या दिल्ली (Delhi) आणि मुंबईतील ऑफिसवर (Mumbai Office) छापा मारत कर्मचाऱ्यांचे फोन जप्त करण्यात आल्याचे म्हटले जात आहे.

मंगळवारी सकाळी सुमारे साडे अकरा वाजता कस्तुरबा गांधी मार्गावर (Kasturaba gandhi road) असलेल्या बीबीसीच्या ऑफिसवर आयकर विभागाने छापा मारला. यानंतर सर्व कर्मचाऱ्यांचे फोन जप्त करण्यात आले. मात्र पीटीआयने दिलेल्या वृत्तामध्ये दिलेल्या माहितीनुसार, अधिकाऱ्याने बोलताना सांगितले की, एका चोरीच्या प्रकरणात मुंबई आणि दिल्लीतील कार्यालयात एक सर्च सर्वेक्षण करण्यात येत आहे. त्यामध्ये कंपनीचा भारतातील कारभार आणि त्यासंदर्भातील दस्तावेजांच्या माहितीसाठी तपास करत असल्याचे म्हटले आहे.

विनाशकाले विपरीत बुध्दी, काँग्रेसचे टीकास्र (Congress criticize to Modi Government)

BBC च्या कार्यालयावर आयकर विभागाने मारलेल्या छाप्यावर काँग्रेसने प्रतिक्रीया दिली आहे. त्यामध्ये काँग्रेसने म्हटले आहे की, आधी बीबीसीचा माहितीपट आला. त्यावर बंदी घातली. आता बीबीसीच्या कार्यालयावर छापा मारण्यात आला. ही अघोषित आणीबाणी असल्याची प्रतिक्रीया काँग्रेसने दिली आहे.

काँग्रेस नेते जयराम रमेश (Jairam Ramesh) यांनी म्हटलं आहे की, आम्ही संयुक्त संसदीय समितीमार्फत (JPC) अदानींची चौकशी (Adani group) करण्याची मागणी करत आहोत. मात्र सरकार बीबीसीच्या मागे लागले आहे. विनाशकाले विपरित बुध्दी असं म्हणत जयराम रमेश यांनी सरकारवर हल्लाबोल केला.

Tags:    

Similar News