गिरीश बापटांच्या निधनानंतर पोटनिवडणूक का घेतली नाही ?
न्यायालयाचा निवडणूक आयोगाला सवाल;
Pune : पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचे निधन झाल्यानंतर पुणे लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक न घेतल्याने विधी पदवीधर तरुणाने भारतीय निवडणूक आयोगाच्या विरोधात उच्च न्यायालयात रिट याचिका (रिट पिटिशन) दाखल केली आहे. यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने सुनावनी दिली आहे. दरम्यान मुंबई उच्च न्यायालयाने निवडणुक आयोगाला निवडणूक का घेतली नाही? असा सवाल केलाय.
या याचिकेमध्ये मुंबई उच्च न्यायालयाने निवडणुक आयोगाला विचारलं की "गिरीश बापट यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पुणे लोकसभा सीटवर पोटनिवडणूक का नाही घेतली गेली असा सवाल विचारण्यात आला होता दरम्यान यावर निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण देत "आम्ही इतर निवडणुकांमध्ये व्यस्त असल्यामुळे निवडणूक घेता आली नसल्याचं आयोगाने सांगितलं आहे.