अधिवेशनानंतर महाविकास आघाडीमधील ५ ते ६ मंत्र्यांना डच्चू?

अधिवेशनानंतर महाविकास आघाडीतील मंत्र्यांची खाती बदलली जाणार आहेत. तर काही मंत्र्यांना डच्चू दिला जाणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे;

Update: 2021-12-22 01:41 GMT

दिल्ली // आज पासून राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनाला सुरूवात होत आहे. या अधिवेशनानंतर महाविकास आघाडीतील मंत्र्यांची खाती बदलली जाणार आहेत. तर काही मंत्र्यांना डच्चू दिला जाणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. जानेवारी मध्ये महाविकास आघाडी सरकारमधील मंत्रिमंडळातही काही बदल केले जाणार आहेत. या बदलात काॅंग्रेसमधील दोन ते तीन मंत्र्यांचा राजीनामा घेतला जाण्याची शक्यता आहे. तर काहींचे खात बदलली जाणार आहेत.

दिल्ली येथे पक्ष श्रेष्ठींसोबत काॅंग्रेस नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत पक्ष श्रेष्ठी काॅंग्रेसमधील काही नेत्यांच्या कामावर नाराज असल्याचं समजतंय. त्यामुळे राज्यात पक्षसंघटनेतील काही बदलांसह मंत्रीमंडळातील काही मंत्र्यांना डच्चू देणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

Tags:    

Similar News