Eknath Shinde : संजय राऊत यांच्यापाठोपाठ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी

संजय राऊत यांना लॉरेन्स बिश्नोई गँगच्या नावाने जीवे मारण्याची धमकी देणारा मेसेज करण्यात आला होता. त्यापाठोपाठ आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी देणारा फोन आला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.;

Update: 2023-04-11 04:50 GMT

गेल्या काही दिवसांपुर्वी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना जीवे मारण्याची धमकी देणारा मेसेज करण्यात आला होता. त्यापाठोपाठ आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना जीवे मारण्याची धमकी देणारा कॉल करण्यात आला आहे. (Life threat call to Eknath Shinde)

112 या हेल्पलाईन क्रमांकावर फोन करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना धमकी देणारा कॉल आल्याची माहिती मिळाली आहे. मी एकनाथ शिंदे यांना उडवणार आहे, असं म्हणत या व्यक्तीने कॉल कट केला. मात्र यानंतर पोलिसांनी धमकी देणाऱ्या आरोपीला अटक केली. आरोपीने दारुच्या नशेत फोन करून धमकी दिल्याचं समोर आलं आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून राजकीय नेत्यांना येणाऱ्या धमक्यांच्या सत्रात मात्र वाढ होत आहे. त्यामुळे प्रशासनाने कठोर निर्णय घेण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

नितीन गडकरी (nitin Gadkari) यांनाही आला होता धमकीचा कॉल

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनाही जीवे मारण्याची धमकी देणारा कॉल आला होता. हा कॉल बेळगावमधील जेलमधून आल्याचं स्पष्ट झालं. यामध्ये दोन कोटींची खंडणी मागितली होती. एवढंच नाही तर अमिताभ बच्चन, अंबानी यांनाही धमकी देण्यात आली होती. त्यामुळे देशात उद्योगपती आणि राजकीय नेत्यांना धमकीचे कॉल येत आहेत. त्यामुळे यासाठी शासनाने कठोर पाऊलं उचलायला हवीत.

Tags:    

Similar News