कोरोनावरील लसी (coronavirus vaccine ) कधी येणार याची देशभरात सर्वजण वाट पाहत असताना आता एका पाठोपाठ दोन गुड न्यूज आल्या आहेत. अमेरिकेन कंपनी फायझरने भारतात कोरोनावरील लसीच्या आपत्कालीन वापराला परवानगी देण्याची मागणी करणारा अर्ज डीजीसीआय अर्थात औषध महानियंत्रकांकडे केलेल असताना आता सिरम इन्स्टिट्युटनेही ऑक्सफर्ड कोव्हीड लसीच्या आपत्कालीन वापरासाठी अर्ज केला आहे.
कोरोनावरील लसीची चाचणी अंतिम टप्प्यात आहे. या लसीचे परिणाम अत्यंत सकारात्मक आहेत, त्यामुळे या लसीच्या आपत्कालीन वापराला परवानगी देण्यात यावी अशी मागणी या अर्जात करण्यात आली आहे. पण ही परवानगी नियमांनुसार आणि सर्व चाचण्यांमधील निष्कर्षांचा अभ्यास करुन दिली जाणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी (narendra modi ) यांनी येत्या काही दिवसात लस येईल आणि त्या लसीच्या वितरणावर केंद्र सरकार राज्यांशी चर्चा करुन काम करत आहे अशी माहिती दिली होती. ही लस सर्वप्रथम आरोग्य कर्मचारी, फ्रंट वर्कर्स, गंभीर आजार असलेले वृद्ध लोक यांना आधी देण्यात येणार आहे.