पेट्रोल डिझेल नंतर आता CNG आणि PNG गॅसही महागला

सीएनजीच्या CNG किमतीत प्रती किलो 2 रुपये 58 पैसे वाढवून 51.98 रुपये इतका तर पाईप PNG गॅससाठी प्रती युनिट 55 पैसे वाढ करण्यात आली आहे. या दरवाढीचा सर्वाधिक फटका रिक्षाचालक आणि टॅक्सी चालकांना बसणार आहे.;

Update: 2021-07-15 08:20 GMT

इंदन दरवाढीव काँग्रेस, शिवसेना,राष्ट्रवादी सातत्याने आंदोलन करत आहेत. इतर राज्यातून देखील दरवाढीला विरोध भडका उडत असताना सातत्याने भाव वाढ होत आहे. पेट्रोल डिझेल नंतर आता सीएनजी आणि पाईप गॅसही महागला आहे. आजकाल अनेक वाहन, टॅक्सीमध्ये सीएनजी CNG आणि पाईप PNG गॅस चा वापर केला जातो. पण आता सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे, पेट्रोल आणि डिझेल दरवाढीपाठोपाठ सीएनजी आणि पीएनजी गॅसच्या किमतीत वाढ करण्यात आली आहे.

मंगळवार मध्यरात्रीपासून मुंबईत प्रती किलो 2 रुपये 58 पैशांची वाढ सीएनजीच्या किमतीत करण्यात आली असल्याच महानगर गॅस लिमिटेड Mahanagar Gas Limited या इंधन पुरवठादार कंपनीने सांगितले आहे , आधीच पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतीमुळे आणखीनच या सिलेंडरच्या Cylinder किंमती वाढीमुळे सामान्य जनतेला धक्का बसला आहे.

सीएनजीच्या CNG किमतीत प्रती किलो 2 रुपये 58 पैसे वाढवून 51.98 रुपये इतका तर पाईप PNG गॅससाठी प्रती युनिट 55 पैसे वाढ करण्यात आली आहे. या दरवाढीचा सर्वाधिक फटका रिक्षाचालक आणि टॅक्सी चालकांना बसणार आहे.

Tags:    

Similar News