#AirtelDown : Jio पाठोपाठ Airtel डाऊन, सोशल मीडियावर मीम्सचा धुरळा

Update: 2022-02-11 08:03 GMT

Jio पाठोपाठ Airtel चे नेटवर्क डाऊन झाल्याने ग्राहकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. तर सोशल मीडियावर मीम्सचा धुरळा उडत आहे. त्यातच कंपनीने ग्राहकांना मनस्ताप झाल्याबद्दल ट्वीट करून दिलगिरी व्यक्त केली आहे.

काही दिवसांपुर्वी रिलायन्स जिओचे नेटवर्क डाऊन झाले होते. त्यामुळे जिओच्या ग्राहकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला होता. तर आता जिओपाठोपाठ एअरटेल कंपनीच्या ब्रॉडबँड आणि मोबाईल सेवा सध्या बंद असल्याच्या तक्रारी ग्राहकांनी ट्वीटरवर केल्या आहेत. तर एअरटेलटे नेटवर्क डाऊन झाल्याने सोशल मीडियावर मीम्सचा धुरळा उडाला आहे.

देशातील विविध ठिकाणी एअरटेल ब्रॉडबँडचे आणि मोबाईल सेवा बंद असल्याच्या तक्रारी ग्राहकांनी केल्या आहेत. तर अनेक ग्राहकांनी एअरटेल केंद्रावर तक्रारी केल्या आहेत. त्याबरोबरच एअरटेल डाऊन झाल्याचा ग्राहकांना मोठा फटका बसला असून कंपनीच्या ब्रॉडबँड आणि वायफाय सेवांवरही परिणाम झाला आहे.

यासंदर्भात एअरटेल कंपनीने ट्वीट करत म्हटले आहे की, आमच्या इंटरनेट सेवांमध्ये थोडासा व्यत्यय आला आहे. तसेच तुम्हाला होत असलेल्या गैरसोयीबद्दल दिलगीर आहोत. परंतू आता सर्वकाही ठीक झाले आहे. त्यामुळे आम्ही ग्राहकांना अखंडीत सेवा देण्यासाठी कटीबध्द आहोत.

दरम्यान एअरटेलचे नेटवर्क डाऊन झाल्याने सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर मीम्स व्हायरल होत आहेत. तर नेटकऱ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे. तसेच काही नेटकऱ्यांनी मजेशीर मीम्स बनवल्या आहेत.

Tags:    

Similar News