गणेशोत्सवानंतर अलिबागमध्ये कोरोना रुग्ण संख्येत वाढ

Update: 2021-09-24 08:08 GMT

रायगड : गणेशोत्सवानंतर कोरोनाचे प्रादुर्भाव जिल्ह्यात वाढल्याचे दिसते आहे. जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या अलिबाग तालुक्यात कोरोना संसर्ग वाढल्याची आकडेवारी समोर आल्याने चिंता व्यक्त होते आहे. गुरुवारी अलिबाग तालुक्यात ४२ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. गणेश उत्सव काळात सोशल डिस्टंसिंगचा पूरता फज्जा उडाला होता. त्यामुळे ही वाढ झाली असण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. अलिबाग तालुक्यात ४२ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तालुक्यातील बांधण, कुरूळ, वाडगाव , गोंधळपाडा , चौल , खंडाळा , अलिबाग शहर यागणेशोत्सवानंतर अलिबागमध्ये कोरोना रुग्ण वाढसेठिकाणी नवे रुग्ण आढळले आहेत. गुरुवारी १४ जण कोरोना मुक्त झाले तर वाडगाव आणि कुरूळ येथील प्रत्येकी एक अशा दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात तळा व म्हसळा तालुके कोरोना मुक्त झाले आहेत.

गेल्या दीड वर्षात अलिबाग तालुक्यात एकूण १९ हजार ९४८ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील १९ हजार ५४ जण कोरोना मुक्त झाले आहेत. ५८५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर सध्या ३० ९ जण उपचार घेत आहेत . गणेशोत्सवापूर्वी तालुक्यात दररोज २० व्या नव्या कोरोना रुग्णांची संख्या होती. पण आता गणेशोत्सव संपल्यानंतर रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे. गुरुवारी तालुक्यात ४२ नवे कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत.

Tags:    

Similar News