G-20 च्या आठवडाभरातच कॅनडाचा भारतावर गंभीर आरोप, भारतीय उच्चायुक्तांना देश सोडण्याचे दिले आदेश
कॅनडाच्या पंतप्रधानांनी कॅनडीयन नागरिकाच्या हत्येचा भारतावर गंभीर आरोप करण्यात आला आहे.;
भारताच्या अध्यक्षतेखाली G-20 देशांची शिखर परिषद झाली. या परिषदेत 83 पॅराचे घोषणापत्र मंजूर करण्यात आल्याने हा भारताचा मोठा विजय मानला जात होता. मात्र जी-20 च्या आठवडाभरातच कॅनडाने भारतावर गंभीर आरोप करत भारतीय उच्चायुक्तांना देश सोडण्याचे आदेश दिले आहेत.
गेल्या आठवडाभरापुर्वी दिल्लीत जी-20 देशांची शिखर परिषद झाली. ही परिषद यशस्वी झाल्याचा दावा पंतप्रधान मोदी यांनी केला होता. तर 83 पॅराच्या घोषणापत्रावर एकमत झाल्याने भारतीय विदेशी नीती यशस्वी झाल्याचेही म्हटले जात होते. मात्र या घटनेला आठ दिवस उलटत नाहीत. तोच कॅनडातील एका नागरिकाच्या हत्येला भारतीय एजेन्सी जबाबदार असल्याचा आरोप कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांनी केला आहे. तर भारतीय उच्चायुक्तांनी तातडीने देश सोडण्याचे आदेश कॅनडाच्या विदेश मंत्रालयाने दिले आहेत. त्यामुळे जी-20 नंतर आठवडाभरातच कॅनडाने भारताला मोठा झटका दिला आहे.
कॅनडातील नागरिक असलेला आणि शीख अलिप्ततावादी नेता हरदीप सिंह निज्जर यांची हत्या झाली. या हत्येमागे भारताचा हात असल्याचा आरोप कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांनी केला आहे. त्याबरोबरच या घटनेमुळे कॅनडातील भारतीय उच्चायुक्तांना देश सोडण्याचे आदेश कॅनडाच्या परराष्ट्र मंत्र्यांनी दिले आहेत. त्यामुळे हा भारताला मोठा धक्का मानला जात आहे.