महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणाला 66 वर्षे पूर्ण होत असताना समाजात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यानंतर समाजाचे प्रश्न मांडणारा वाली उरला नसल्याची भावना सर्वसामान्य लोकांत आहे. त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले असून यावर विचार विनिमय होणे आवश्यक आहे. असे आंबेडकरी साहित्यिक योगीराज वाघमारे यांना वाटते.