68 वर्षांनंतर पुन्हा एकदा एअर इंडिया टाटा समूहाच्या ताब्यात

Update: 2021-10-09 02:37 GMT

मुंबई  :  टाटा सन्सने तब्बल 18000 कोटी रुपये मोजून अखेर एअर इंडिया खरेदी केली आहे. 68 वर्षांनंतर पुन्हा एकदा एअर इंडिया टाटा समूहाच्या ताब्यात आली आहे. पण, एअर इंडियाची सद्यस्थिती पाहता एअर इंडिया कंपनीला पुन्हा रुळावर आणण्यासाठी टाटा समूहाला प्रचंड मेहनत घ्यावी लागणार आहे असे रतन टाटा यांनी म्हटले आहे.

एअर इंडियावर सध्या तब्बल 15000 कोटी रुपयांचे कर्ज आहे. तसेच भारतातील हवाई सेवा क्षेत्रात एअर इंडियाला अनेक खासगी कंपन्यांसोबत स्पर्धा करावी लागणार आहे. दरम्यान देशातील हवाई सेवा क्षेत्राकडून टाटा समूहाला सहकार्य मिळण्याची गरज असल्याचे मत रतन टाटा यांनी व्यक्त केले आहे. टाटा समूहाने एअर इंडियाला 18000 कोटींमध्ये खरेदी केले आहे. या कराराअंतर्गत टाटा समूह एअर इंडिया कंपनीचे 15300 कोटी रुपयांचे कर्ज फेडणार आहेआणि सरकारला 2700 कोटी रुपये रोख म्हणून देणार आहेत.

जेआरडी टाटा यांच्या नेतृत्वाखाली एअर इंडियाने एकेकाळी जगातील सर्वात प्रतिष्ठित विमान कंपन्यांपैकी एक म्हणून नावलौकिक मिळवला होता. एअर इंडियाला आधीची प्रतिष्ठा पुन्हा मिळवून देण्याची संधी टाटाला मिळाली आहे.जर आज जेआरडी टाटा असते, तर त्यांना खूप आनंद झाला असत, असं रतन टाटा यांनी म्हटले आहे याबाबत त्यांनी एक ट्विट केले आहे.

एअर इंडियाची स्थापना 1932 मध्ये टाटा एअर सर्व्हिसेस म्हणून झाली होती, ज्याचे नंतर टाटा एअरलाईन्स असे तिचे नामकरण करण्यात आले होते.

Tags:    

Similar News