अखेर पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्याला प्रशासनाची परवानगी; मुंडे समर्थकांमध्ये उत्साह
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्याला प्रशासनची परवानगी मिळाली आहे. त्यामुळे ऊसतोड मजुरांसह मुंडे समर्थकांमध्ये उत्साह दिसून आला आहे. गतवर्षी कोविडच्या पार्श्वभूमीवर दसरा मेळावा ऑनलाइन घेण्यात आला असताना देखील पंकजा मुंडेंवर गुन्हा दाखल झाला होता. त्यामुळे मुंडे समर्थक आक्रमक झाले होते.
यंदा प्रशासनाच्या परवानगीने दसरा मेळावा होणार आहे. भगवान भक्ती गडावरून पंकजा मुंडे या ऊसतोड कामगार आणि मुंडे समर्थकांना मार्गदर्शन करतात, दिवाळीनंतर जिल्ह्यातील जवळपास पाच लाखांहून ऊसतोड मजूर स्थलांतर करून ऊस तोडणीसाठी जातात, त्यापूर्वी या दसरा मेळाव्याच्या आयोजनाची परंपरा आहे. भगवान गडावर दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी ही परंपरा सुरु केली होती, मात्र पंकजा मुंडे यांना या ठिकाणी परवानगी नाकारल्यानंतर त्यांनी भगवान बाबांच्या जन्मगावी हा दसरा मेळावा घेण्यास सुरुवात केली आहे. यंदाच्या दसरा मेळाव्याला परवानगी मिळाल्याने, मुंडे समर्थकांमध्ये उत्साह दिसून आला आहे.