आदित्य ठाकरे बनले अजित दादांचे सारथी

Update: 2022-02-11 11:38 GMT

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे या दोन्ही नेत्यांनी शुक्रवारी सकाळी अचानक मुंबईतील काही भागांचा धावता दौरा केला. अजित पवार आणि आदित्य ठाकरे पहाटेच घरातून बाहेर पडले होते. या दोन्ही नेत्यांनी मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्स, वरळी आणि धोबी तलाव परिसरातील प्रकल्पांची पाहणी केली. विशेष म्हणजे अजित पवार आणि आदित्य ठाकरेंनी एकाच गाडीने प्रवास केला. यावेळी आदित्य ठाकरे गाडी चालवत होते.


Full View

Tags:    

Similar News