आदिपुरुष सिनेमावरून मनसे-भाजप आमने-सामने येणार?
भाजपने विरोध केलेल्या आदिपुरुष सिनेमाला मनसेने पाठींबा दिला आहे.;
लोकमान्य आणि तान्हाजी या चित्रपटांतून इतिहासाची मांडणी करणारे मराठी आणि बॉलिवूड दिग्दर्शक ओम राऊत यांच्या आगामी काळातील आदिपुरूष या चित्रपटाला भाजपने विरोध दर्शवला आहे. मात्र मनसेने या चित्रपटाला पाठींबा दर्शवला आहे. त्यामुळे भाजप नेत्यांनी राज ठाकरे यांच्या भेटी घेतल्यानंतर युतीची चर्चा होत असतानाच आदिपुरुष सिनेमावरून मनसे भाजप आमने-सामने येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सैफ अली खान याने केलेल्या रावणाच्या भुमिकेवर आणि चित्रपटात केलेल्या VFX वर अनेकांनी आक्षेप घेतला आहे. त्यातच भाजप आमदार राम कदम यांनी आदिपुरूष चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. मात्र मनसेच्या चित्रपट सेनेचे प्रमख अमेय खोपकर यांनी मात्र आदिपुरूष या सिनेमाला समर्थन दिले आहे.
मनसेचे चित्रपट कामगार सेनेचे अमेय खोपकर यांनी ट्वीट केले आहे. त्यामध्ये अमेय खोपकर म्हणाले की, ओम राऊत या दिग्दर्शकाने यापूर्वी लोकमान्य आणि तान्हाजी या कलाकृतींमधून इतिहासाची अभ्यासपूर्ण मांडणी केलेली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात ओम राऊत यांनी साकारलेला भव्य लाईट ॲंड साऊंड शो आजही दिमाखात सुरु आहे.
१)ओम राऊत या दिग्दर्शकाने यापूर्वी लोकमान्य आणि तान्हाजी या कलाकृतींमधून इतिहासाची अभ्यासपूर्ण मांडणी केलेली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात ओम राऊत यांनी साकारलेला भव्य लाईट ॲंड साऊंड शो आजही दिमाखात सुरु आहे.
— Ameya Khopkar (@MNSAmeyaKhopkar) October 7, 2022
त्यातच ओम राऊत यांच्या आगामी 'आदिपुरुष'चित्रपटाच्या टीझरवरुन टीका होणं हे दुर्दैवी आहे. ओम राऊत आणि सहकाऱ्यांच्या प्रामाणिक प्रयत्नांची प्रचिती चित्रपट प्रदर्शित झाल्यावर येईल, अशी आम्हाला खात्री आहे. म्हणूनच महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेचा 'आदिपुरुष' निर्मितीला पूर्ण पाठिंबा आहे, असं ट्वीट अमेय खोपकर यांनी केलं आहे.
२)ओम राऊत याच्या आगामी 'आदिपुरुष' टीझरवरुन टीका होणं हे दुर्दैवी आहे. ओम राऊत आणि सहकाऱ्यांच्या प्रामाणिक प्रयत्नांची प्रचीती चित्रपट प्रदर्शित झाल्यावर येईल अशी आम्हाला खात्री आहे. म्हणूनच महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेचा 'आदिपुरुष' निर्मितीला पूर्ण पाठिंबा आहे.
— Ameya Khopkar (@MNSAmeyaKhopkar) October 7, 2022
राम कदम काय म्हणाले होते?
राम कदम यांनी आदिपुरुष हा सिनेमा महाराष्ट्रात प्रदर्शित करू देणार नसल्याचे म्हटले होते.
#आदिपुरुष फिल्म को महाराष्ट्र के भूमी प्रदर्शित नही होने देंगे#आदिपुरुष फिल्म मे पुनः एक बार फिल्म निर्माताओ ने ओछी पब्लिसिटी पाने के लिये हमारे #देवी #देवताओ विडंबन करके कराडो करोडो हिंदू लोगो की श्रद्धा और आस्था को आहत किया.
— Ram Kadam (@ramkadam) October 6, 2022
अब समय आ गया है .. केवल माफीनामा या विडंबन का
दृश्य काट छाट से काम नही चलेगा.
— Ram Kadam (@ramkadam) October 6, 2022
ऐसी घिनोनी सोच को सबक सिखाने के लिये
इस प्रकार के कोई भी फिल्म को आजीवन पुरी तरह से #बॅन तथा जिम्मेदार लोगोको भी
पुरी तरह से इस इंडस्ट्री मे काम करनेसे कुछ साल #बॅन कर दिया जाय..
ताकी भविष्य मे कोई भी ऐसी हिम्मत ना करे..