Adani Group Share Price:एका दिवसात अदाणींची संपत्ती ५४ हजार कोटींनी घटली; अब्जावधींचा फटका
देशाच्या प्रजासत्ताक दिनापुर्वीच अदानी समूहातील कंपन्यांचे शेअर कोसळल्याने उद्योजक गौतम अदानी यांना अब्जावधी रुपयांचा फटका बसला आहे. अदानी एंटरप्रायजेसचे शेअर अंदाजे 25 टक्क्यांनी घसरून 1201 रुपयांवर वर आले.तर अदानी पोर्ट्स आणि अदानी स्पेशल इकोनॉमिक झोनचे शेअर 18.75 टक्क्यांनी घसरून आता 762 रुपयांवर आले आहेत.;
गेल्या काही दिवसात मोदी सरकारच्या मदतीने अदानी समुहाने मोठी प्रगती केली आहे. एका दिवसाच्या झटक्यात देशातल्या दुसऱ्या सर्वाधिक श्रीमंत माणसाच्या म्हणजेच गौतम अदानींच्या संपत्तीमध्ये कमालीची घट झाली आहे. १४ जूनला सकाळी शेअर मार्केट उघडल्यानंतर अदानी एंटरप्राईजेसचे शेअर्स धाडकन पडले. नॅशनल सिक्युरिटीज डिपोझटरी लिमिटेड या सरकारी संस्थेने 3 फॉरेन पोर्टफोलिओ अकाऊंट गोठवल्याच्या बातम्यांमुळे शेअर्समध्ये घसरण झाल्याचं सांगितलं जातंय. या पोर्टफोलिओ अकाऊंट्सची अदानी एंटरप्राईजेसमध्ये गुंतवणूक होती. अदानी समूहाने खाती गोठवल्याचे नाकारले आहे.
याव्यतिरिक्त अदानी ग्रीन एनर्जीचे शेअर्स 5 टक्क्यांनी कोसळून 1165.35 वर आले. अदानी टोटल गॅसचे शेअर 5 टक्क्यांनी घसरून 1544.55 वर आले. अदानी ट्रान्समिशनचे शेअर्स घसरून 1517.25 रुपयांवर आले तर अदानी पावर 4.99 ने गडगडून 140.90 वर आले.
या सगळ्या शेअर्सला लोअर सर्किट लिमिट लागलं
अदानी समूहाचे शेअर्स गडगडण्याआधी गेल्या 12 महिन्यांत त्यांची उत्तम कामगिरी होती. या स्टॉक्सची किंमत इतक्या वेगाने वाढली की 2021 मध्ये अदानी समूह सगळ्यांत वेगाने श्रीमंत होणारा समूह ठरला. समूहाच्या शेअर्सची किंमत सतत वाढत असल्याने गेल्या शुक्रवारपर्यंत आशियातले दुसरे सर्वाधिक श्रीमंत असणाऱ्या गौतम अदानी यांच्या श्रीमंतीत 43 अब्ज डॉलर्सची भर पडली होती.
गौतम अदानींच्या कंपन्यांसाठी सोमवारची सकाळ चांगली ठरली नाही. ग्रुपच्या 6 लिस्टेड कंपन्यांचे शेअर्स 5% वरुन 22% पर्यंत घसरले आहेत. यामध्ये सर्वात जास्त अदानी एंटरप्रायजेसचे शेअर पडले आहेत. शेअर्स 22% घसरून 1,200 रुपये झाले आहेत. शुक्रवारी हे 1600 रुपयांवर बंद झाले होते. यानंतर इतर कंपन्यांचे शेअर्सही त्याच मार्गाने पडले. यामुळे सुरुवातीच्या एक तासात गुंतवणूकदारांचे सुमारे 50,000 कोटी रुपयांचे नुकसान झाले.
3 परदेशी गुंतवणूकदारांच्या गुंतवणूकीवर शंका
शेअर्सच्या घसरणीचे कारण हे होते की, सेबीने या ग्रुप कंपन्यांमधील अशा तीन परदेशी गुंतवणूकदारांना पकडले, ज्यांना बोगस मानले जाते. हे तीन गुंतवणूकदार आहेत - अल्बुला इन्व्हेस्टमेंट फंड, क्रेस्टा फंड आणि एपीएमएस इन्व्हेस्टमेंट फंड. हे सर्व मॉरीशसची राजधानी पोर्ट लुईसच्या एका पत्त्यावर रजिस्टर्ड आहेत. त्यांची वेबसाइटसुद्धा नाही. या तिघांची गुंतवणूक सेबीने फ्रिज केली असून तपास सुरू झाला आहे.
एकूण गुंतवणूक 43,500 कोटी रुपये
नॅशनल सिक्युरिटी डिपॉझिटरी लिमिटेड (NDSL) नुसार अदानीच्या कंपन्यांमध्ये या तिघांची एकूण गुंतवणूक 43,500 कोटी रुपये आहे. ही खाती फ्रिज केली गेली कारण सेबीकडे त्यांच्याविषयी माहिती नाही. तसेच, या पैशांचे मालक कोण आहेत, हे देखील माहिती नाही. त्यामुळे त्यांच्यावर मनी लॉन्ड्रिंग कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये अदानी समूहाचा कोणताही मुद्दा नाही परंतु त्यांच्या शेअर्समध्ये ही गुंतवणूक आहे, त्यामुळे या ग्रुपच्या शेअर्समध्ये घट दिसून आली आहे.
'खाती गोठवण्याच्या बातम्या निराधार'
माध्यमांमध्ये आलेल्या बातम्यांनुसार नॅशनल सिक्युरिटीज डिपोझटरी लिमिटेट या संस्थेने 3 परकीय गुंतवणूक संस्थांची खाती गोठावली आहेत. या संस्थांची एकत्रितरित्या अदानी समूहाच्या 4 कंपन्यांमध्ये गुंतवणूक आहे. या बातम्या अदानी समूहाने फेटाळाल्या आहेत.3 एफपीआय खाती गोठवण्याच्या बातम्यांवर अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकोनॉमिक झोन्सकडून स्पष्टीकरण दिलं गेलं आहे. त्यात म्हटलंय की या बातम्या निराधार आहेत.
त्यांनी आपल्या स्पष्टीकरणात लिहिलं की, "आम्हाला हे सांगताना वाईट वाटतंय पण हा रिपोर्ट चुकीचा आहे आणि मुद्दाम आमच्या गुंतवणुदारांना गोंधळात पाडण्यासाठी दिलेला आहे. यामुळे आमच्या उद्योग समूहाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होतंय."
अदानी समूहाने पुढे असंही म्हटलं की, "या बातम्यांची गंभीरता आणि लहान लहान गुंतवणूकदारांवर याचा होणारा परिणाम यामुळे आम्ही या तीन फंड्सच्या डीमॅट अकाऊंटच्या परिस्थितीबद्दल रजिस्ट्रार आणि ट्रान्सफर एजेंटकडे अर्ज केलेला आहे. याची लिखित पुष्टी आम्हाला इमेलव्दारे 14, 2021 ला मिळालेली आहे. यात असं स्पष्ट केलेलं आहे का या फॉरेन फंड्सच्या ज्या डीमॅट अकाऊंटमध्ये अदानी ग्रुपचे शेअर्स आहेत त्यांना गोठवलेलं नाही.