अदानी कंपनीचा कारभार , साडेतीन हजार घरं अंधारात
राज्यात ऐन उन्ह्याळ्यात कोळशाच्या तुटवड्यामुळे वीज संकट असतानाच अदानी कंपनीने मुंबईतील चेंबुर परिसरातील साडेतीन हजार घरांची वीज तोडली आहे. त्यामुळे नागरिकांनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे.;
मुंबईतील चेंबुर भागातील सिध्दार्थ कॉलनी भागात ऐन उन्हाळ्यात नागरिक उकाड्याने त्रस्त होत असताना अदानी कंपनीने साडेतीन हजार घरांची वीज तोडली आहे. त्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे. मात्र गेली 16 वर्षे नागरिकांनी वीजबीलेच भरले नसल्याचे कंपनीचे म्हणणे आहे.
अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेड या कंपनीने ग्राहकांच्या थकबाकीमुळे साडेतीन हजार घरांची वीज तोडण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. तर याबाबत नागरिकांशी मॅक्स महाराष्ट्रने संवाद साधला असता नागरिकांनी सांगितले की, 2005 मध्ये पुनर्विकासासाठी परवानगी मिळावी यासाठी तुमची वीज बीले भरू असे सांगितले होते. तेव्हापासून सिध्दार्थ कॉलनी भागातील नागरिकांनी वीजबीलं भरणे थांबवले होते. मात्र तब्बल 16 वर्षानंतर आता कंपनीने ग्राहकांची वीज तोडली आहे.
नागरिकांनी याबाबत बोलताना सांगितले की, आम्हाला कोणत्याही प्रकारची पुर्वसुचना न देता आमची वीज कापली. तर या सगळ्या प्रकरणाला विकासकच जबाबदार आहे, अशी प्रतिक्रीया नागरिकांनी व्यक्त केली. तर सिध्दार्थ कॉलनीचा विकास व्हावा, यासाठी 2005 साली एसआरएने पुढाकार घेतला होता. त्यानुसार या भागाचा विकास करण्यात आला. मात्र त्यानंतर या भागातील नागरिकांच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी विकासकाने वीज बील भरणार असल्याचे सांगितले. त्यामुळे नागरिकांनी आजपर्यंत बील भरले नाही. त्यामुळे अदानी समुहाने नागरिकांची वीज तोडली. त्यामुळे नागरिकांनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे.