Stock Market: शेअर बाजारात अदानी समूहाची दाणादाण

Update: 2023-02-03 06:15 GMT

हिंडेनबर्गच्या आरोपानंतर अदानी समूहाचे शेअर्स मोठ्या प्रमाणावर ढासळले आहेत. त्यामुळे अदानी समूहावर जाहीर केलेला FPO मागे घ्यावा लागला. त्यातच शुक्रवारी सप्ताहाच्या अखेरच्या दिवशी शेअर बाजार सुरु होताच अदानी समूहाला मोठा दणका बसला आहे. 

हिंडेनबर्गच्या रिपोर्टमुळे (Hindenberg Report) अदानी समूहाच्या शेअरमध्ये सुरु असलेली घसरण सप्ताहाच्या अखेरच्या दिवशीही सुरुच आहे. त्याचत 3 फेब्रुवारी रोजी अदानी समूहाचे शेअर लोअर सर्किटमध्ये (Lower circuit) आहेत. गेल्या सहा दिवसांत अदानी समूहाच्या (Adani Group) शेअर्समध्ये आलेल्या घसरणीमुळे अदानी समूहाच्या कंपन्यांना 108 अब्ज कोटींचा फटका बसला आहे. त्यातच शुक्रवारी शेअर बाजार सुरु होताच अदान समूहाच्या ACC च्या शेअर्समध्ये 3.86 टक्के, अदानी एन्टरप्रायजेसमध्ये 35 टक्के, अदानी ग्रीन एनर्जीमध्ये 10 टक्के, अदानी पोर्ट आणि सेझमध्ये 9.92 टक्के, अदानी पॉवरमध्ये 5 टक्के, अदानी टोटल गॅसमध्ये 5 टक्के, अदानी ट्रान्समिशनमध्ये 10 टक्के, अदानी विल्मरमध्ये 4.99 टक्के, अंबूजा सिमेंटमध्ये 7.39 टक्के घसरण झाली आहे. 


Tags:    

Similar News