काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या मध्य प्रदेशातील भारत जोडो यात्रेचा (bharat jodo yatra) आज गुरुवारी नववा दिवस आहे. 85 व्या दिवशी ध्वजारोहणानंतर सकाळी 6 वाजता उज्जैनजवळील सुरासा येथून यात्रेला सुरुवात झाली. यात्रेच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येने लोक हातात गुलाब घेऊन रस्त्याच्या कडेला उभे होते.
आरडी गार्डी कॉलेजसमोरून हा मोर्चा आगर माळव्याकडे निघाला. उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री हरीश रावत आणि बॉलीवूड अभिनेत्री स्वरा भास्कर (Swara Bhasker)हेही राहुलसोबत आज भारत जोडो यात्रेत सभागी झाल्याचे दिसत आहे.
घाटिया परिसरातून जाणारी यात्रा नाझरपूर येथे चहापान करण्यासाठी थांबेल त्यानंतर सकाळी 10 वाजता विश्रांती साठी थांबले जाईल. दुपारी 3:30 वाजता हा प्रवास पुन्हा सुरू होईल.
आजचा कार्यक्रम कसा असेल..
आज गुरुवारी ही यात्रा सुमारे 21 किलोमीटरचे अंतर पार करणार आहे. उद्या शुक्रवारी ही यात्रा आगर जिल्ह्यात दाखल होणार आहे. यात्रेदरम्यान अनेक ठिकाणी राहुल गांधी यांचे पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात येणार आहे. राहुल गांधींच्या स्वागतासाठी अनेक ठिकाणी स्टेज लावण्यात आले आहेत.